Headlines

Baba Ramdev : ‘ही मानसिक संतुलन बिघडल्याची लक्षणं’, कंगनाच्या ‘जनरेशन गटर’च्या वक्तव्यावर बाबा रामदेवांचा संताप


Baba Ramdev On Kangana Ranaut : बाबा रामदेव यांनी कंगना रणौतच्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Baba Ramdev On Kangana Ranaut
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – योगगुरू बाबा रामदेव यांनी कंगना रणौतच्या जेन झीबद्दल केलेल्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्यावर टीका केली आहे. देशातील तरुणांना ‘जनरेशन गटर’ म्हणणं हे वाईट मानसिकता आहे, असं बाबा रामदेव म्हणाले.

कंगनाच्या जेन झीबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बाबा रामदेव म्हणाले, ‘तिची शैक्षणिक पात्रता काय आहे? तिचं बालपण कसं होतं? तिनं तरुण असताना काय केलं? तिचे जुने कारनामे काय होते?’ मला अशा लोकांबद्दल बोलायचं नाही. जेन झीसह कोणत्याही देशातील कोणत्याही तरुणांना गटार म्हणणं ही मानसिक संतुलन बिघडल्याची लक्षणं आहेत. हे चुकीचं आहे. जे काही घडत आहे, त्याबद्दल तिच्या पक्षाच्या सदस्यांनी दखल घेतली पाहिजे.’

Maharashtra TimesAjinkya Deo : कॅमेराची भीती, पण वडिलांच्या स्वप्नाखातर अभिनयात एन्ट्री; आज मराठी इंडस्ट्रीतलं नावाजलेलं नाव, लवकरच झळकणार रणबीर कपूरच्या सिनेमात

कंगना तुमची अनुयायी असून स्वतःला सनातनी मानते, असं विचारलं असता बाबा रामदेव म्हणाले, ‘जर ती माझ्या योगाचं कौतुक करत असेल, तर मी तिची पापं झाकून ठेवू का?’ तरुणांना कोणतीही जात नसते. तरुणांमध्ये सर्वांचा समावेश असतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दलित, आदिवासी, वनवासी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अशी सर्व मुलं आहेत. आजची तरुण पिढी स्वतःच एक शक्ती आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही, असंही बाबा रामदेव यांनी सांगितलं. टीव्ही९ भारतवर्षसोबत साधलेल्या संवादात रामदेव बाबा बोलत होते.

Kangana Ranaut VS Genz | गटरछाप…आंदोलनाचे व्हिडीओ बघून मळमळतंय, खासदार कंगना रनौत काय बोलल्या?

काय म्हणालेली कंगना?

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेलं की, ‘मी या पिढीला ‘जनरेशन गटार’ म्हणते. या तरुणांकडे समाजाला किंवा व्यवस्थेला देण्यासाठी काहीही नाही. हे तरुण अभ्यासात चांगले नाहीत आणि घर सांभाळण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. आई-वडिलांच्या पैशांवर जगणं, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि स्वतःच्या पायावर उभं न राहता स्वातंत्र्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. ही पिढी गटार आहे.’

Maharashtra TimesShubhavi Gupte : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती! अवघ्या 20व्या वर्षी स्वबळावर घेतली कार, व्यक्त केल्या भावना
कंगनाच्या वक्तव्यानंतर बराच वाद निर्माण झालेला. त्यावर स्पष्टीकरण देताना कंगना म्हणालेली की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना विद्यार्थी ‘एक्जाम बडी’ म्हणतात. कोणी त्यांना देव मानतं, कोणी लीडर मानतं, घरातील सदस्य मानतात. त्यांचा तुम्ही अपमान करू शकत नाही. हे कूल बनण्याचं लक्षण नाही. हा एक साधा नियम आहे. हे तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला शिकावं लागेल. तुम्ही या स्त्रीवाद्यांकडून प्रभावित होऊ नका. स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. बाहेर जाऊन तुम्हाला मर्यादेतच राहावं लागेल.’