राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप केला. या आरोपांवर मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपांनंतर सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टची पत्रकार परिषद पार पडली. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी यावेळी भूमिका मांडली. यावेळी सदा सरवणकर यांनी सिद्धीविनायक मंदिरात काही अनियमित प्रकार झाल्याचं मान्य केलं. या प्रकरणी मंदिर ट्रस्टच्या जवळपास अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं. तसेच मंदिराच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचं सदा सरवणकर यांनी सांगितलं.
“महायुतीच्या काळात सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली. त्यानंतर मंदिरातील जी काही अनियमितता आहे त्यावर बंधनं यावीत यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाने काम करत असताना लक्षात आलं की, कर्मचाऱ्यांमध्ये काही कंत्राटी तर पर्मनंट कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांकडून दर्शन देण्यासाठी काही पैसे घेतले जातात. ते ऑनलाईन घेतले जातात, असं लक्षात आलं”, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं.
‘कर्मचाऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतले’
“त्यावेळेला मी काही कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं आणि त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना काही दिवस सस्पेंड केलं. त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतलं की, यापुढे असं कृत्य आमच्याकडून होणार नाही. यानंतर लक्षात आलं की, बाहेरचे काही स्टॉलवाले आणि एजंट मंडळी हे परस्पर लोकांना दर्शन देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार व्हायचा. हा व्यवहार आम्ही तातडीने बंद केला”, अशी माहिती त्यांनी दिली.
‘9 कर्मचारी पकडले, त्यांच्यावर कारवाई केली’
“यानंतर काही ठिकाणी कर्मचारी हातचालाखी करुन पैसे काढतात हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं आणि कारवाई करण्याची विनंती केली. त्यावेळेला 9 कर्मचारी पकडले गेले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे उत्पन्न जे कमी होतं ते वाढलं”, असा दावा सदा सरवणकर यांनी केला.
‘भटजींना बैठक घेऊन पैसे दानपेटीत टाकायला सांगितलं’
“भक्त येतो तेव्हा पेटीत काही पैसे दान करत आणि भटजींना काही देतो. पण नियमाप्रमाणे भटजींना कोणी पैसे दिले तर दानपेटीत टाकावेत, असा नियम आहे. पण त्या नियमाकडे दुर्लक्ष केले जात होते. आम्ही कटाक्षाने भटजींसोबत बैठका घेऊन सांगितलं की, आपल्याला जे पैसे दिले जातील ते देखील दानपेटीत टाका. ते टाकल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात निधीची वाढ होत असल्याचं लक्षात आलं”, असं सदा सरवणकर म्हणाले.
‘उत्पन्नात डबलचा फरक’
“ही वाढ आणखी कशी करता येईल किंवा यापूर्वीदेखील ही वाढ होऊ शकली असती हे ऑडिटमध्ये कसं दाखवता येईल, यासाठी आमचे ट्रस्टी लक्ष देत आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढलेलं आहे. दोन वर्षापूर्वी 40 ते 45 लाख जमा व्हायचे. आता ती रक्कम 90 ते 98 लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे आताच्या आणि आधीच्या उत्पन्नात फरक का होता ते शोधावं यासाठी पत्र लिहिलं आहे”, असं सरवणकर यांनी स्पष्ट केलं.
‘आपलेच कर्मचारी पैसे मोजायला ठेवले’
“पैसे मोजण्यासाठी बाहेरचे एनजीओ बोलावले जायचे. त्यांच्या माध्यमातून हे पैसे मोजले जायचे. आमच्या लक्षात आलं की हे जर थांबवलं आणि आपलेच कर्मचारी पैसे मोजण्यासाठी लावले तर त्यामुळेही उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यामुळे उपाययोजना केल्या”, अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा