Headlines

Richest People Luxury House; अँटिलिया सर्वात महाग निवासस्थान, अंबानींच्या शेजारी वसलंय दुसरे सर्वात महागडे घर; टॉप 10 घरांच्या किमतीत पूर्ण गावच घेता येईल

India 10 Most Expensive Homes: भारतातील लक्झरी निवासी बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अल्ट्रा-लक्झरी घरांची मागणी वाढल्याचे आघाडीच्या रिअल इस्टेट सल्लागारांचे म्हणणे आहे.

India's 10 most expensive private residences
देशातील अत्यंत महागड्या निवासी मालमत्तांची झलक
Most Expensive Houses in India: भारतातील सर्वात महागडी निवासी मालमत्ता कोणती? असं विचारलं तर प्रत्येकजण मुकेश अंबानींचा ‘अँटिलिया’ म्हणेल. पण तुम्हाला माहित्येय का की भारतातील 10 सर्वात महागड्या निवासी मालमत्ता कोणकोणत्या आहेत? मुकेश अंबानींच्या घरापाठोपाठ भारतातील दुसरे सर्वात महागडे घर कोणाचे आहे?

अँटिलिया, मुंबई (15000 कोटींहून जास्त)

अँटिलिया, मुंबई (15000 कोटींहून जास्त)

यात कोणतीच शंका नाही की या यादीत ‘अँटिलिया’ आघाडीवर आहे. अल्टमाउंट रोड, ज्याला ज्याला ‘भारतातील अब्जाधीशांचा मार्ग’ किंवा ‘बिलियनेअर्स रो’ म्हणूनही ओळखले जाते, वर स्थित अँटिलियाचा उल्लेख न भारतातील आलिशान रिअल इस्टेटची चर्चा अपूर्ण आहे. मुकेश अंबानींच्या परिवाराचे 27 मजली खासगी निवासस्थान 4,00,000 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले असून या जमिनीची किंमत अमूल्य आहे. मर्यादित पुरवठा, दक्षिण मुंबईशी जवळीक आणि अरबी समुद्राच्या विस्मयकारक दृश्यांमुळे अल्टमाउंट रोडवरील जमिनीच्या किमती आशियातील सर्वाधिक मूल्यांपैकी मानल्या जातात.

जेके हाऊस, मुंबई (6000 कोटींहून जास्त)

जेके हाऊस, मुंबई (6000 कोटींहून जास्त)

रेमंड ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम सिंघानिया जेके हाऊसचे मालक आहेत. अल्टमाउंट रोडवर स्थित हे घर भारतातील दुसरे सर्वात महागडे निवासस्थान आहे. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी-अल्टमाउंट रोड परिसरात असलेल्या या सुमारे 30 मजली इमारतीत आलिशान निवासस्थाने, स्पा सुविधा आणि मनोरंजनासाठी जागांसह हेलिपॅडचीही सोय आहे. जेके हाऊस मुकेश अंबानींच्या अँटिलियाच्या शेजारी वसलेले आहे.

अबोड, मुंबई (5,000 कोटींपेक्षा जास्त)

अबोड, मुंबई (5,000 कोटींपेक्षा जास्त)

वांद्रे येथील पाली हिलमढी ‘अबोड’ येथे उद्योगपती अनिल अंबानी आपल्या कुटुंबासह राहतात.मुंबईतील सर्वात उच्चभ्रू निवासी जिल्ह्यांपैकी म्हणून प्रसिद्ध पाली हिल येथे अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची घरे आहेत. या बहुमजली हवेलीमध्ये आलिशान जागा आणि असंख्य खाजगी सोयी-सुविधा आहेत.

गुलिता, मुंबई (सुमारे 450 ते 800 कोटी रुपये)

गुलिता, मुंबई (सुमारे 450 ते 800 कोटी रुपये)

पिरामल कुटुंबाने ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांना गुलिता लग्नाची भेट म्हणून दिलेले. ही पाच मजली इमारत वरळी सी-फेसवर वसलेली असून येथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते, तर सी-लिंकमुळे वांद्रे-वरळी भारतातील प्रमुख उंच इमारतींचे मार्केट बनले आहे.

लिंकन हाऊस

लिंकन हाऊस

सीरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन आणि अब्जाधीश सायरस पूनावाला यांचे दक्षिण मुंबईतील पॉश बीच क्रेडी परिसरातील लिंकन हाऊस भारतातील पाचवे सर्वात महागडे निवासी मालमत्ता आहे. या घराची किंमत अंदाजे 750 कोटी रुपये असून सुमारे 2 एकर परिसरात पसरलेले असून लिंकन हाऊस याआधी अमेरिकेचा दूतावास असायचे आणि वांकानेरच्या महाराजांनी अमेरिकन सरकारला दान केले, तर 2015 मध्ये सायरस पूनावाला यांनी खरेदी केले.

जाटिया हाऊस, मुंबई (425 कोटींहून अधिक)

जाटिया हाऊस, मुंबई (425 कोटींहून अधिक)

मलबार हिल येथे स्थित जाटिया हाऊस कुमार मंगलम बिर्ला यांच्या मालकीचे असून ही तीन मजली हवेली सुमारे 25000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेली असल्याचे सांगितले जाते. या बंगल्याचं वैशिष्ट्य म्हणजे की येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. मर्यादित घरे आणि मरीन ड्राइव्हचे अद्वितीय दृश्य यामुळे मलबार हिल भारतातील सर्वात महागड्या निवासी परिसरांपैकी मानला जातो.

गौतम अदानींचा ल्युटियन्स बंगला (मूल्य 400 कोटी रुपयांहून अधिक)

गौतम अदानींचा ल्युटियन्स बंगला (मूल्य 400 कोटी रुपयांहून अधिक)

अदानींच्या दिल्लीतील मालकीच्या ल्युटियन्स बंगल्याचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. मोठे भूखंड, वसाहतकालीन स्थापत्यशैली आणि संसद व इतर सरकारी इमारतींशी असलेली जवळीक दिल्लीतील प्रतिष्ठित LBZ मध्ये स्थित अदानींच्या या निवासस्थानचे वैशिष्ट्ये आहे. या ठिकाणी वारसा जतनाशी संबंधित कडक नियमांमुळे पुनर्विकासावर कडक निर्बंध आहेत.

अझीम प्रेमजींचे निवासस्थान, बेंगळुरू (मूल्य 350 कोटींपेक्षा जास्त)

अझीम प्रेमजींचे निवासस्थान, बेंगळुरू (मूल्य 350 कोटींपेक्षा जास्त)

अझीम प्रेमजींचे बेंगळुरू येथील निवासस्थान शहरातील वाढत्या अत्यंत आलिशान गृहनिर्माण बाजाराचे उत्तम उदाहरण आहे. IT क्षेत्रातील रोजगाराची केंद्रे आणि उत्तम मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे व्हाईटफील्डचा परिसर एक आलिशान निवासी क्षेत्र म्हणून विकसित केला गेला असून हा भाग प्रामुख्याने मोठ्या ‘गेटेड कम्युनिटीज’ आणि आलिशान व्हिलांसाठी ओळखला जातो.

नीरज बजाज यांचे घर

नीरज बजाज यांचे घर

देशातील 10 सर्वात महागड्या घरांच्या यादीत बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांच्या घराचा दहावा क्रमांक लागतो. या घराला ‘मलबार हिल्स ट्रायप्लेक्स’ असे म्हणतात. 2023 मध्ये घेतलेल्या दक्षिण मुंबईत सुमारे 18000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या नीरज बजाज यांच्या घराची अंदाजे किंमत 252 कोटी रुपये आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा