Mumbai pune railway service resumes good news for passengers landslides cleared; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे मार्गावर अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे धावली, ४ गाड्या सुटल्या
Mumbai pune railway service resumes good news for passengers landslides cleared; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे मार्गावर अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे धावली, ४ गाड्या सुटल्या
Mumbai Pune Train Updates: बुधवारी मध्यरात्रीपासून लोणावळा-खंडाळा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे.
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे मार्गावर अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे धावली, ४ गाड्या सुटल्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बंडू येवले, पुणे: सोमवारी मध्यरात्री अतिवृष्टीमुळे खंडाळा घाटमाथा परिसरात रेल्वे मार्गावर सहा ते सात ठिकाणी लोहमार्गावर दरडी कोसळल्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मागील तीन दिवसांपासून ठप्प झालेली रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरडी हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. परंतु घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे दरडी हटवण्याच्या कामात सातत्याने अडथळे निर्माण होत होते. मात्र आता अखेर रेल्वे प्रशासनाला दरड हटवण्यात यश आलं असून काही गाड्या मुंबईतून पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
तीन दिवसांपासून ठप्प झालेल्या मुंबई पुणे रेल्वे सेवेमुळे हजारो प्रवाशांना मोठा फटाका बसला. तसंच रेल्वेचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने सर्व नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत बुधवारी सकाळी मुंबई पुणे लोहमार्गावरील मिडल लाईनवरील दरड हटवून काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरू केली. मुंबईहून पुण्याकडे जाणारी इंद्रायणी व इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांसह इतर दोन लांब पल्ल्याच्या जलदगती गाड्या रवाना झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून इतर गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, खंडाळा घाटातील ठिकठिकाणच्या दरडी हटवण्याची मोहीम सुरू असताना बुधवारी सकाळी खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ पुन्हा एकदा दरड कोसळल्याने रेल्वे महामार्गावरील दरड संकटात आणखी भर पडली आहे.
मिसिंग लिंकवर कशी आहे स्थिती?
मावळात सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मिसिंग (कनेक्टिंग) लिंक प्रकल्पाला मोठा फटाका बसला होता. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग (कनेक्टिंग) लिंकच्या मार्गिकेवरील पहिल्या बोगद्याच्या केबल पुलाकडील तोंडावर मोठी दरड आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेला सिमेंटचा अवाढव्य पिलर, मलबा, काही टन वजनाचे दगड कोसळले होते. यामुळे मिसिंग (कनेक्टिंग) लिंकवरील वाहतूक ठप्प झाली होती. सदर दरड आणि मलबा हटवण्याचे काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेला दरड हटवण्यात १२ तासांनी यश आले.
राज्य सरकारने आणि सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर दरड युद्धपातळीवर हटवण्याचे आदेश रस्ते विकास महामंडळ आणि प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या नवयुगा कंपनीला दिले होते. संबंधित दोन्ही यंत्रणांनी कोसळलेली दरड युद्धपातळीवर हटवण्याची मोहीम सोमवारी सकाळी आठ वाजता हाती घेत सोसाट्याच्या वाऱ्यासह वरुन कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसात सुरू ठेवली. यासाठी रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, इंजिनिअर, कुशल मनुष्यबळ आणि तत्सम संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या पोलिस बंदोबस्तात कनेक्टिंग लिंकवरील केबल पुलावर कोसळलेला मलबा पूर्णपणे १२ तासांत दूर करून मिसिंग लिंकवरील दोन्ही बाजूकडील चार मार्गिकांपैकी दोन्ही मार्गिकेवरील प्रत्येकी एक मार्गिका सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता सुरू केली. त्यानंतर रात्री दहा वाजता दुसऱ्या मार्गिकेवरून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू केली. तर मिसिंग लिंकवरील दोन्ही बाजूकडील चार मार्गिकांपैकी दोन मार्गिका या सध्या सुरू असलेल्या पावसाच्या परिस्थितीचा विचार करून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलिसांनी घेतला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा