Headlines

Ranchi Student Protest: झारखंडमध्ये JPSC, JSSC, CGL घोटाळा, 14 अटकेत, Sonam Wangchuk यांचा पाठिंबा – jharkhand student protest jpsc jssc cgl exam scam ranchi agitation


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#RanchiStudentProtest #RanchiProtest #DevendraMahato #HemantSoren #JPSCExamProtetsदिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनावर पावलावर पाऊल ठेवत, झारखंडची राजधानी रांचीमध्ये विद्यार्थ्याचं एक मोठं आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्याचा थेट आरोप आहे की, JPSC, JSSC आणि CGL परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाले आहेत. त्यामुळेच परीक्षांमधील अनियमिततेच्या निषेधार्थ रांचीमधील जयपाल सिंह मुंडा इथं सरकारविरोधात अनिश्चित काळासाठी हे ठिय्या आणि निषेध आंदोलन सुरू आहे. जुलै महिन्यापासून हे विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले असून आज त्यांच्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे. यासोबतच सोनम वांगचुक यांचा आदर्श घेऊन विद्यार्थी नेते आणि कार्यकर्ते देवेंद्र नाथ महतो हे २५ जुलैपासून सत्याग्रह आंदोलन करत होते आणि त्यानंतर २ ऑगस्टपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप लावले असून काही मागण्या मांडल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा सीआयडी तपास करत असून माजी जेपीएससी अध्यक्षांची चौकशी सुरू असून अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सरकारानं अजूनही विद्यार्थ्यांशी संवाद न साधल्यानं हे आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आणखी आगीत तेल ओतणारं विधान केलं असून, सरकारला डोळे, कान आणि संवेदनशीलता आहे. सरकार परिक्षांसंदर्भातील तपासात काय करतंय हे ‘मी माझी छाती फाडून नाही दाखवू शकत नाही’ असं म्हटलंय. त्यामुळं हे प्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. एकूणच काय घडतंय रांचीमध्ये, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना कोणते गंभीर आरोप आणि मागण्या केल्यात, आणि त्यासोबतच राज्यातील सीआयडीनं कोणकोणत्या संशयितांना अटक केल्या आहेत तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#Jharkhand #Ranchi #JharkhandNews #StudentProtest #YouthProtest #JPSC #JSSC #CGLExam #ExamScam #PaperLeak #RecruitmentScam #JPSCExam #JSSCExam #RanchiProtest #DevendraNathMahto #DevendraMahato #SonamWangchuk #HungerStrike #WaterFast #CIDInvestigation #JharkhandGovernment #HemantSoren #YouthMovement #GroundReport #IndiaNews #BreakingNews #LatestNews #CompetitiveExam #GovernmentJobs #ExamIrregularitiesFollowing the student protest at Delhi’s Jantar Mantar, a major agitation has erupted in Ranchi, the capital of Jharkhand. Students have alleged irregularities in the JPSC, JSSC, and CGL examinations and have been staging an indefinite sit-in against the state government since July. The protest has now entered its 11th day. Inspired by Sonam Wangchuk, student leader Devendra Nath Mahto began a satyagraha on July 25 and has been on an indefinite hunger strike since August 2, with today marking the fourth day. As the CID investigates the alleged exam scam, several suspects have been arrested and former JPSC officials are under scrutiny. This video explains the allegations, the students’ demands, and the latest developments in the investigation.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत