Headlines

Rajkummar Rao : ‘मोदी है तो मुमकिन है’ गाण्यामुळे राजकुमार राव ट्रोल; अभिनेता म्हणाला, ‘तो दबाव तुम्हाला कळणार नाही’


Rajkummar Rao : ‘मोदी है तो मुमकिन है’ या गाण्यामुळे राजकुमार रावला ट्रोल करण्यात आलं असून अभिनेत्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे.

Rajkummar Rao Trolled For Modi Hai To Mumkin Hai Song
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेता राजकुमार रावनं बुधवारी विद्यार्थी आंदोलनाबद्दल पोस्ट करून पाठिंबा व्यक्त केला. यानंतर, ‘मोदी है तो मुमकिन है’ या गाण्याबद्दल सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित झाले. काही नेटकऱ्यांनी राजकुमार राववर गाण्यासाठी दबाव टाकला गेला असावा, असं म्हटलं आहे. अशातच आता यावर राजकुमार रावनं प्रतिक्रिया दिली. पण, नंतर आपली कमेंट डिलीट केली.

एका युजरनं लिहिलं की, ‘मला तुमच्याबद्दल खूप आदर होता. पण एका गाण्यामुळे तुम्ही तो आदर गमावला आहे. मी तुमचा एकही चित्रपट चुकवला नव्हतं. पण तुम्ही इतक्या सहजपणे स्वतःला विकून टाकाल हे मला माहीत नव्हतं. त्याऐवजी तुम्ही कलाकारांच्या नवीन पिढीचं नेतृत्व करायला पाहिजे होतं.’
Maharashtra TimesRanjana Deshmukh : अपघातानं अपंगत्व आलं, तरीही नाही मानली हार; रंजना देशमुख यांनी व्हिलचेअरवर बसून नाटकात केलेलं काम

राजकुमार रावची प्रतिक्रिया

यावर राजकुमार रावनं लिहिलं की, ‘भावा…मी माझा आत्मा कधीच विकू शकत नाही आणि एक गाणं हे मी कोण आहे, माझी तत्त्वं काय आहेत किंवा आयुष्याबद्दलची माझी विचारधारा काय आहे, हे ठरवू शकत नाही, तुम्हाला तो दबाव काय असतो हे कधीच कळणार नाही.’

‘जे काही बरोबर आहे आणि जे आपल्याला माणूस म्हणून एकत्र बांधून ठेवतं, त्याच्या बाजूनं मी कायम उभा आहे. जोपर्यंत माझी सद्सद्विवेकबुद्धी चांगली आहे आणि मी खूप मेहनत घेऊन काम करतोय, तोपर्यंत मला अशा कोणत्याही गोष्टींची पर्वा नाही. जे लोक मला वैयक्तिकरित्या ओळखतात, त्यांना माहित आहे की, मी कोण आहे आणि तुमच्या नजरेत मी पुन्हा माझ्याबद्दल आदर मिळवेन अशी आशा आहे. तुझ्या आयुष्यात तुला शुभेच्छा आणि आनंदी राहा.’ असं राजकुमारनं पुढे म्हटलं आहे.

Prakash Ambedkar On Maharashtra Band | प्रकाश आंबेडकरांचे पोलिसांवर गंभीर आरोप | CJP Protest

अभिनेत्यानं कमेंट डिलीट केली

राजकुमार रावनं नंतर ही कमेंट डिलीट केली. मात्र, त्याच्या कमेंटचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यानं कमेंट का डिलीट केली? असा प्रश्न लोक विचारत आहेत. ‘तुझ्यावर कोणता दबाव होता का?’ असंही अनेकांनी विचारलं आहे.