Headlines

Rajasthan Farmer Buries ₹5 Lakh in Field: पुरलेल्या पैशांची जागा विसरला, वाळवीनं फस्त केल्या नोटा – rajasthan farmer buries 5 lakh termites destroy notes


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#FarmerStory #FarmerNews #FarmerLife #FarmerMoney #FiveLakh #BuriedMoney #Termites #DamagedNotes #CurrencyNotes #BankNews #RBI #IndianFarmer #ViralNews #ShockingNews #RealStory #FarmingNews #MaharashtraNews #MarathiNews #IndiaNews #TrendingNewsएक शेतकरी दिवसरात्र आपल्या शेतात राबत असताना पै पै करून ५ लाख रुपये जमवतो. आपल्या कष्टायची पुंजी आणि घामाची कमाई जपून सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला वाटतं की इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा आणि मुलं- बायको खर्च करतील म्हणून या पैशांसाठी आपली जमिनीच सर्वात सुरक्षित जागा आहे, तिजोरी आहे. चोरीच्या भीतीने तो हे ५ लाख रुपये एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधतो आणि आपल्या १० बिघा शेत असलेल्या जमिनीत पुरून ठेवतो. त्यानंतर बराच काळ जातो आणि जेव्हा त्याला पैशांची गरज भासते, तेव्हा ते पैसे नेमके कुठे पुरले आहेत, हेच तो विसरून जातो…बरं ही रक्कम पुरताना तो कुणालाच सांगतही नाही. त्यामुळं आता शोधायचं कुठे असा प्रश्न कुटुंबासमोर असतो. पैसे न सापडल्यानं त्यानंतर मुलासह तो शेतकरी आणि बायको सगळं शेत खोदून काढतात. पण हाती काहीच लागत नाही. हाती लागेत ती फक्त निराशा आणि झालेला पश्चाताप. यानंतर बराच काळ जातो. एक दिवस शेतात नांगरणी सुरू असताना अचानक त्या नांगरला पुरलेल्या पैशांची पिशवी लागते आणि त्याला अत्यंत आनंद होतो. मात्र ही पैशांची पिशवी तो जेव्हा बाहेर काढतो तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. डोळ्यात अश्रू असतात आणि सगळं कुटूंब हताश झालेलं असतं. याचं कारण म्हणजे ती ५ लाखांची रक्कम जमिनीत पुरलेली असताना त्याला वाळवी लागते आणि अक्षरशः त्या नोटा कुरडाललेल्या असतात. मंडळी हे तुम्हाला अगदी काल्पनिक वाटेल.., मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय की काय असंही वाटू शकतं… मात्र हे खरं आहे… जरा विचार करा… काय परिस्थिती ओढावली असेल त्या शेतकऱ्यावर आणि कुटुंबावर… तेव्हा हे प्रकरण नेमकं कुठे घडलंय, या ५ लाखांचं बँकेत नेल्यावर पुढे काय झालं आणि आयुष्यभराची कमाई त्याला पुढे परत मिळाली का… हेच आपण या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप रंजक आहे. शेवटपर्यंत नक्की बघा.A farmer saves ₹5 lakh through hard work and buries it in his field to keep it safe from theft and family spending. He forgets the spot. The family digs everywhere but finds nothing. Later, while ploughing, the bag is found—but termites have completely destroyed the notes. The family is heartbroken. This is a true story. Watch the full video to know where it happened, what the bank said, and if he recovered the money.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत