तुकाराम मुंढेंचा बॉलीवूड कलाकारांना दणका! SRK, अजय, टायगरला FDA ची नोटीस – tukaram mundhe led fda issues notices to shah rukh khan ajay devgn and tiger shroff
तुकाराम मुंढेंचा बॉलीवूड कलाकारांना दणका! SRK, अजय, टायगरला FDA ची नोटीस – tukaram mundhe led fda issues notices to shah rukh khan ajay devgn and tiger shroff
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आता बॉलीवूड स्टार्स आल्याची माहिती समोर आली आहे. कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे बॉलीवूडचे अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना FDA कडून नोटीस बजावण्यात आली आहे. एका जाहिरातीमुळे या तिघांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. जाहिरातीतून विमल पान मसाल्याचं प्रमोशन केल्याचा आरोप केला जातोय. याप्रकरणीच तिघांनाही स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.