Raj Thackeray On Vivek Oberoi And R. Madhavan : राज ठाकरे यांनी विवेक ओबेरॉय आणि आर. माधवनला टोला लगावला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – देशातील अनेक सेलिब्रिटी केंद्र सरकारविरोधात उघडपणे बोलताना दिसतात, तर काही जण सरकारला उघडपणे पाठिंबा देतात. या सेलिब्रिटींमध्ये विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांचा समावेश आहे. आता, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरे यांची टीका
अलीकडेच, मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना – मनव्हीएस) २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका रॅलीत राज ठाकरे यांनी आर. माधवन आणि विवेक ओबेरॉय यांच्यावर टीका केली. विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांनी मोदी सरकारचं कौतुक केलेलं. याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘जर मोदींनी सर्व काही इतकं चांगलं केलं आहे, तर तुम्ही परदेशात का राहत आहात?’
Raj Thackeray Uddhav Thackeray UNCUT PC | ठाकरेंचा मोर्चा होणारच!! मातोश्रीतून मोठी घोषणा
‘पंतप्रधान मोदींवर चित्रपट बनवणारा आणि त्यात त्यांची भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉय दुबईला स्थायिक झाला आहे. देश बदलला आहे असं म्हणत असूनही, मोदींचं कौतुक करणारा आर. माधवनसुद्धा दुबईत स्थायिक झाला आहे. जर देश बदलला असेल आणि तुम्हाला भारतावर प्रेम असेल व तुम्ही पंतप्रधान मोदींचं कौतुक करताय, तर तुम्ही परदेशात का राहताय? हे कलाकार कुटुंबासकट दुबईला जाऊन का राहतायत? इथे येणार, सरकारी स्पॉन्सर चित्रपटांमध्ये काम करणार. ते ‘धुरंधर’ वगैरे… इथे कमाई करुन परत जाणार दुबईला. देशात खूप चांगलं चाललं आहे. मी चाललो दुबईला, असं म्हणत जातात. ही माणसं दुबईला जातायेत’ असंही राज ठाकरे पुढे म्हणाले. Om Puri : ‘त्यांचं मोलकरणीसोबत अफेअर होतं, तरी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला’, ओम पुरींबद्दल एक्स पत्नीचा दावा; म्हणाली, ‘खूप उशीर झालेला’ दरम्यान, आर. माधवन आणि विवेक ओबेरॉय यांनी मुलाखतींमध्ये ते दुबईत का राहतात याचं स्पष्टीकरण दिलं आहे. माधवननं सांगितलं की, कोविड-१९ दरम्यान आपल्या मुलाच्या करिअरसाठी त्याला दुबईला स्थलांतरित व्हावं लागलं. दुसरीकडे, विवेक आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी दुबईला गेला. Divya Bharti : ‘मला वाचवा…’ दिव्या भारतीचा शेवटचा सीन अन् दुसऱ्या दिवशी तिच्या निधनाची बातमी; दिग्दर्शकानं सांगितला प्रसंग विवेक ओबेरॉय शेवटचा ‘मस्ती ४’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला. तसेच आर. माधवन शेवटचा ‘धुरंधर २’ मध्ये दिसला असून हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरलेला.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा