Headlines

Rainfall in marathwada contact lost with 10 villages heavy rain causes chaos; मराठवाड्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस; ८ ते १० गावांचा संपर्क तुटला


छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर जोरदार पुनरागमन केलं आहे. मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, पेरणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील पावसाचा जिल्हानिहाय सविस्तर आढावा-

छत्रपती संभाजीनगर: ५ मंडळांत जोरदार हजेरी
मुख्य गावे: पैठण तालुक्यातील आडूळ मंडळात सर्वाधिक ९८ मिमी पाऊस झाला.
शहरी भाग: छत्रपती संभाजीनगर मुख्य शहरात ९१.२ मिमी, कचनेरमध्ये ८० मिमी, तर चिकलठाणा परिसरात ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
एकूण जून महिन्याचा विचार केला तर आतापर्यंत विभागात ४७.७ मिमी पाऊस झाला आहे.

जालना: ४ महसूल मंडळांमध्ये हाहाकार
अतिवृष्टीचे क्षेत्र: जालना शहरासह रामनगर, पाचणवडगाव आणि धनगर पिंपरी या भागांत पावसाने रौद्ररूप धारण केले होते.
नुकसान: विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसात घरांची पडझड झाली असून ४ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
आकडेवारी: रामनगरमध्ये ९० मिमी, धनगर पिंपरीत ९१ मिमी तर जालना शहरात ८७ मिमी पाऊस कोसळला.

परभणी (जिंतूर): ८ ते १० गावांचा संपर्क तुटला!
जिंतूर तालुक्यातील आडगाव शिवारामध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला असून शेतातील माती खरडून गेली आहे.
वाहतूक ठप्प: ओढ्याला पूर आल्यामुळे आडगाव बाजार ते आडगाव फाटा हा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
संपर्क तुटलेली गावे: आडगाव बाजार, मोखेड, गडदगव्हाण, सोरजा, टाकळखोपा, भुसकाढोपा, श्रीरामवाडी, चितनेरवाडी, दगडवाडी आणि रायगड तांडा या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे.

नांदेड: हदगावमध्ये ३ तास ‘धो-धो’
मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला या पावसाने मोठा आधार दिला आहे. हदगाव, अर्धापूर, मुखेड आणि कंधार भागात बुधवारी दुपारी मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला; हदगावमध्ये सलग ३ तास मुसळधार पाऊस झाला.

हिंगोली: राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी
वाहतूक विस्कळीत: हिंगोली शहराजवळील बासंबा परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रोडवर गुडघाभर पाणी साचले आणि वाहनधारकांची कोंडी झाली.
तीर्थक्षेत्राची स्थिती: प्रसिद्ध औंढा नागनाथ मंदिर परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले होते.

लातूर: जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून लातूर जिल्ह्यात केवळ भुरभुर पाऊस असून जळकोटमध्ये सर्वाधिक १३२.९ मिमी पाऊस झाला आहे.

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात तब्बल ८० टक्के तुटीचा पाऊस आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध केले असून, कमीत कमी १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत