Headlines

Rain in konkan updated information on routes from mumbai pune to ratnagiri raigad; पावसाचं थैमान; मुंबई-पुण्यातून कोकणात जायचं असेल तर कोणते रस्ते सुरू, कोणते बंद? जाणून घ्या सविस्तर


Mumbai Goa Highway: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू असून चर्चेत राहिलेला परशुराम घाट मार्गही सुरू आहे.

ratnagiri rain news
पावसाचं थैमान; मुंबई-पुण्यातून कोकणात जायचं असेल तर कोणते रस्ते सुरू, कोणते बंद? जाणून घ्या सविस्तर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात गेले काही दिवस पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून या पावसाचा मोठा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालाही बसला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात खवटी येथे पडलेली दरड बाजूला करण्यात आल्याने सोमवारी दुपारपासून या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरू आहे. रायगड जिल्ह्यात नागोठणे येथीलही पाणी ओसरल्याने आता वाहतूक सुरू असल्याने आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला आहे. कोकणातून रत्नागिरीतून कोल्हापूर, पुण्याला जाण्या-येण्यासाठी चिपळूण येथील कुंभार्ली घाट व संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आंबा घाट हे दोन मार्ग सुरू आहेत. मातर कोकणातून पुण्याला जाणारे बाकी सगळे मार्ग बंद झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट भूस्खलनामुळे आणि वाढत्या दरडींचा धोक्यामुळे 31 जुलैपर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसंच माणगाव मार्गे ताम्हिणी हा पुण्याला जाणारा मार्गही वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला आहे. महाड येथून वरंधा घाटही दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे.

खेड तालुक्यातून महाडला जोडणाऱ्या नातूनगर मार्गे महाड या मार्गावर पुन्हा एकदा विन्हेरे येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस आता कमी झाला असून येथून जिल्ह्याबाहेर पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे सगळे घाट मार्ग सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा सावंतवाडी तालुक्यातील आंबोली मार्गे आजरा कोल्हापूर कर्नाटक राज्याला जोडणारा मार्ग सुरू आहे. तिलारी वैभववाडी तालुक्यातील कोल्हापूरकडे जाणारा खारेपाटण मार्गे भुईबावडा घाट, कणकवली जवळील फोंडा घाट मार्ग सुरू आहे.

दरम्यान, मुंबई, पुण्याकडून दापोलीकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाचा असलेला दापोली- मंडणगड मार्ग सुरू असला तरीही या मार्गावर ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे चिखल आला आहे. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. रत्नागिरी-रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबे पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकडून कोकणात येण्या-जाण्यासाठी टोळ फाटा मार्गे दापोली, खेड, चिपळूण मार्ग सुरू आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा