भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय वाद महाराष्ट्राला नवीन नाही. दोन्ही नेते नेहमीच एकमेकांवर टीका करत असताना दिसतात. पण मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मागे रोहित पवार उभे असतानाच पडळकर यांनी थेट त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. एवढंच नाही तर रोहित पवारांसमोरच त्यांनी शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला.