Headlines

Naresh Mhaske Slams Manoj Jarange Over Shinde Double Game Allegations


शिवसेना नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील शिवसेनेच्या सुनावणीसंदर्भात केलेल्या दाव्यांचा आणि ट्वीटचा समाचार घेत म्हस्के यांनी त्यांच्यावर ‘पतंग

.

संजय राऊत फक्त पतंगबाजी करतात

संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचे सुचवणाऱ्या ट्वीटबद्दल विचारले असता म्हस्के म्हणाले, “संजय राऊत यांची नेहमीच पतंगबाजी करण्याची सवय आहे. जसे काही न्यायमूर्तींनी त्यांच्या कानातच येऊन निकाल काय देणार हे सांगितले आहे, अशा प्रकारे ते वागत आहेत. जेव्हा न्याय आपल्या बाजूने लागतो तेव्हा ते न्यायालयाचे कौतुक करतात आणि विरोधात गेला की शिव्या घालतात, हाच त्यांचा उद्योग आहे.”

उरलेले नेते सांभाळा, तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये विलीन व्हाल

शिवसेना (शिंदे गट) हा बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात किंवा भाजपमध्ये विलीन होईल, या राऊत यांच्या दाव्याची म्हस्के यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, “संजय राऊतांनी आमच्या पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात जे काही उरलेसुरलेले नगरसेवक, आमदार आणि खासदार आहेत, ते कसे पक्षात टिकतील याची काळजी करावी. काल सुप्रीम कोर्टात जे दोन खासदार (अनिल देसाई आणि अरविंद सावंत) त्यांच्यासोबत होते, ते तरी कायम राहतील का, हे बघावे. राऊत साहेब दुसऱ्यांना विलीन होण्याचा सल्ला देतात. उद्या स्वतःला राज्यसभेचे तिकीट मिळाले नाही, तर ते स्वतःच काँग्रेसमध्ये किंवा एमआयएम, समाजवादी पक्षात विलीन होतील.”

शिंदे साहेबांमुळेच राऊत राज्यसभेवर

“मागच्या राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे साहेबांनी मनावर घेतले म्हणूनच संजय राऊत खासदार म्हणून निवडून आले. कारण सर्व आमदार त्यावेळी शिंदे साहेबांसोबत होते. जर तेव्हाच शिंदे साहेबांनी मनात आणले असते, तर राऊतांचा खेळखंडोबा नक्कीच झाला असता,” असा मोठा गौप्यस्फोटही म्हस्के यांनी केला.

मनोज जरांगेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘डबल गेम’ करत असल्याचा आणि मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या ओबीसी नेत्यांना ‘बाळासाहेब भवन’ व संजय शिरसाट यांच्या कार्यालयात बैठका घेऊ दिल्याचा आरोप केला होता. यावर म्हस्के यांनी सावध भूमिका घेतली.

ते म्हणाले, “मनोज जरांगे यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण राज्याचे आणि सर्व समाजाचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ओबीसी नेते असोत किंवा इतर समाजाचे प्रतिनिधी, उपमुख्यमंत्र्यांना सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यावेच लागते. ते कोणाला भेटण्यापासून रोखू शकत नाहीत.”

संजय शिरसाट यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकांबद्दल बोलताना ते म्हणाले, “जर जरांगे साहेबांकडे याचे काही पुरावे असतील, तर त्यांनी ते उपमुख्यमंत्र्यांना द्यावेत, उपमुख्यमंत्री नक्कीच यावर कार्यवाही करतील. मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे साहेब नेहमीच ठामपणे उभे राहिले आहेत, याची जरांगे साहेबांनाही कल्पना आहे.”

हेही वाचा..

उद्धव ठाकरेच बरे म्हणायची वेळ येईल! कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगे आक्रमक, शिंदे-फडणवीस आणि बावनकुळेंवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची जात वैधता (Validity) रद्द केल्याच्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. पत्रकार परिषदेत अत्यंत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ‘मराठा समाजाचे वाटोळे करण्याचा कट’ रचल्याचा थेट आरोप केला आहे. पुराव्यांचे ढीग सोबत घेऊन आलेल्या जरांगे यांनी अनेक गौप्यस्फोट करत महायुती सरकारला आगामी निवडणुकीत सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द होत नाहीत! जरांगेंना मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- भाजपच्या नेत्यांचीही झाली, रिजेक्शन रेट 10 ते 25 टक्के असतोच

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या प्रकरणावरून सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजकीय द्वेषापोटी आणि काही मंत्र्यांच्या सांगण्यावरून हजारो विद्यार्थ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत, असा जरांगेंचा आरोप होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

माझी नार्को टेस्ट करण्यास काहीच हरकत नाही: मनोज जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचे प्रत्युत्तर, जात पडताळणी समितीच्या अधिकारांवरही दिले स्पष्टीकरण

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. “बावनकुळेंच्या दबावामुळे आणि सांगण्यावरूनच मराठा समाजाची कुणबी जात प्रमाणपत्रे आणि त्यांची वैधता (Validity) रद्द केली जात आहे. त्यांची नार्को टेस्ट करा,” अशी आक्रमक मागणी जरांगे यांनी केली होती. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर स्पष्टीकरण देत जरांगेंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत