Headlines

Chhatrapati Sambhajinagar News:नांदेड रेल्वे विभागात विशेष रेल्वे तिकीट तपासणी मोहीम ;एक हजारावर फुकटे प्रवासी ताब्यात


Chhatrapati Sambhajinagar News: रेल्वेचा प्रवास हा प्रवाशांसाठी खुप सुखकर मानला जातो. दिवसा गणिक कित्येक प्रवासी हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. पण सगळेच प्रवासी नियमांच पालन करून प्रवास करतात अस नाही. नांदेडच्या रेल्वे विभागाने सोमवारी अशीच विशेष रेल्वे तिकीट तपासणी मोहीम राबवली आणि नियमांच पालन न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली.

_फुकट्या प्रवाशांवर कारवाई
म.टा. प्रतिनिधी ,छत्रपती संभाजीनगर:नांदेड रेल्वे विभागात सोमवारी विशेष रेल्वे तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकाच दिवशी तब्बल एक हजार ८७ फुकट्या; तसेच अनियमित प्रवाशांकडून सहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पाच लाख ९८ हजार ३३५ रुपयांचा महसूल वसूल

सोमवारी (३ ऑगस्ट) रेल्वे तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ३२ तिकीट चेकींग स्क्वॉड कर्मचारी, १४९ तिकीट तपासणी कर्मचारी, १४ स्टेशन तपासणी कर्मचारी आणि चार विभागीय वाणिज्य निरीक्षक; तसेच तीन रेल्वे सुरक्षा बलचे कर्मचारी सहभागी झाले. या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तब्बल २९ गाड्यांची तपासणी केली. या तपासणीत विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास आणि बुक न केलेले सामान अशा एकूण १ हजार ८७ प्रकरणांची नोंद करण्यात आली. यातून एकूण पाच लाख ९८ हजार ३३५ रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला.

Maharashtra TimesPune Police: सिंघमगिरी पुणे पोलिसांच्या अंगलट! तीन आरोपींना कारवर बसवून शहरात फिरवणाऱ्या PI ची बदली, पोलीस महासंचालकांना नोटीस

एक हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

ही तिकीट तपासणी मोहिम हजूर साहिब नांदेड-आदिलाबाद, हजूर साहिब नांदेड-परभणी-जालना-छत्रपती संभाजीनगर मनमाड, परभणी-परळी वैजनाथ आणि पूर्णा-अकोला या मार्गावर राबविण्यात आली. याशिवाय तिकीट तपासणी व्यतिरिक्त अनधिकृत फेरीवाल्यांची पाच प्रकरणांमध्ये दहा हजरांचा दंड वसूल करण्यात आला आले. याशिवाय अस्वच्छता करणाऱ्या चार प्रकरणांमध्येएक हजार १०० रुपयांचा दंडआकारण्यात आला.

कारवाईचा एकूण आकडा

नांदेड रेल्वे विभागात सोमवारी झालेल्या विशेष रेल्वे तिकीट तपासणीत फुकट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. कारवाईचा एकूण आकडा काय आहे याची माहिती
. विनातिकीट प्रवास ( twt ) ५१६ ४,०४,५९०

. अनियमित प्रवास ( irt ) १५७ १, १७, ३१०

. बुक न केलेले सामान ( ubl ) ४१४ ७६,४३५

Maharashtra TimesRavindra Dhangekar : महायुतीत पुन्हा जुंपली? ‘एकनाथ शिंदेंमुळे भाजप सत्तेत’; विजय चौधरींच्या कथित ऑडिओ क्लिपने रविंद्र धंगेकर संतापले

नांदेड रेल्वे विभागाकडून कारवाई

रेल्वे प्रवास करताना बिना तकिट प्रवास करण्यासाठी तर दंड आहेतच पण त्या सोबतच अनियमित प्रवास आणि बुक न केलेले सामान.यासाठी देखील दंड आकारण्यात येतो.त्या अंतर्गत नांदेड रेल्वे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.एक हजारावर फुकट प्रवासी ताब्यात घेण्यात आले .

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा