Raigad Ratnagiri Sindhudurg MLC Elections Bal Mane Withdrawal Candidacy Now about Mobile Status; ‘रिव्हेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम…’; काल निवडणुकीतून माघार, आज स्टेटसची जोरदार चर्चा, बाळ मानेंचा कुणाला सल्ला?
Raigad Ratnagiri Sindhudurg MLC Elections Bal Mane Withdrawal Candidacy Now about Mobile Status; ‘रिव्हेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम…’; काल निवडणुकीतून माघार, आज स्टेटसची जोरदार चर्चा, बाळ मानेंचा कुणाला सल्ला?
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानंतर बाळ माने यांचे मोबाईल स्टेटस चर्चेत आलं आहे.
बाळ माने मोबाईल स्टेटस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर बाळ माने आता पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मात्र, याचदरम्यान आता बाळ माने यांच्या मोबाईलवरील स्टेटस चर्चेत आलं आहे.
बाळ मानेंचं मोबाईल स्टेटस काय?
‘मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो… त्याचवेळी मनातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात….Revenge is a waste of time,’ म्हणजेच सुड घेणे हा वेळेचा अपव्यय आहे’, अशा शब्दात स्टेटस ठेवत बाळ माने यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या बाळ माने यांचे स्टेटस चर्चेत आलं आहे. मुळातच बाळ माने हे भाजपचे कट्टर शिलेदार राहिले आहेत तथा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीतील नाराजीनंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर त्यांनी उदय सामंत यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूकही लढवली. मात्र, त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. Ashadhi Ekadashi 2026 : अवघे गर्जे पंढरपूर..! संत तुकोबांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर, प्रस्थान कधी अन् मुक्काम कुठे असणार? देहूत जय्यत तयारी
आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोकण मतदार संघातून त्यांनी महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या निवडणुकीत महायुतीची ताकद ही जास्त असल्याचं स्पष्ट होतं. तरीही बाळ माने यांनी अनिकेत तटकरे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या भेटीनंतर बाळ माने यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतला. खासदार नारायण राणे व बाळ माने यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. राणे यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर चर्चेनंतर बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत ते थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झाले आहेत. Vikram Kakade : माझ्या मुलाला विजयी होऊ द्या; संजय काकडेंचा फोन, शरद पवारांचा सकारात्मक प्रतिसाद, 14 वर्ष जुन्या मदतीची परतफेड
लवकरच भाजपात प्रवेश
या निवडणुकीत राणे यांच्या भेटीनंतर बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं नितेश राणे यांनीही ‘कोकणात आपला शब्द अंतिम असतो’, असा संदेश अनेक नेत्यांना या राजकीय घडामोडीतून देण्यात राणे यशस्वी झाले आहेत. राणे यांच्या करिश्म्यामुळे खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, बाळ माने यांच्या भाजप प्रवेशासाठी मुंबई येथे नितेश राणे तसेच भाजपच्या नेत्यांबरोबर बैठकही झाली आहे, ते लवकरच पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा