Pune Talegaon Railway Station Parking Car Shed Baramati Woman Assault Two men Life Imprisonment Crime News; पुणे तळेगाव रेल्वे स्टेशन पार्किंग कारशेडमध्ये बारामतीच्या तरुणीसोबत सामूहिक अत्याचार, दोघा नराधमांना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप
Pune Talegaon Railway Station Parking Car Shed Baramati Woman Assault Two men Life Imprisonment Crime News; पुणे तळेगाव रेल्वे स्टेशन पार्किंग कारशेडमध्ये बारामतीच्या तरुणीसोबत सामूहिक अत्याचार, दोघा नराधमांना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप
Talegaon Station Woman Assault Case : तळेगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघा आरोपींनी बारामतीच्या १८ वर्षीय तरुणीला जेवण देण्याच्या बहाण्याने नेत सामूहिक कुकर्म केले होते.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : असहाय तरुणीला जेवण देण्याच्या बहाण्याने तळेगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधील शेडमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
समाजात कठोर संदेश आवश्यक
‘हतबल पीडितेच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा गैरफायदा घेऊन गंभीर आणि घृणास्पद गुन्हा करणारे गुन्हेगार कोणत्याही दयेला पात्र नाहीत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी समाजात कठोर संदेश जाणे आवश्यक आहे,’ असे नमूद करून विशेष न्यायाधीश श्रीराम तापकिरे यांनी हा निकाल दिला.
ही घटना २५ ते २६ जानेवारी २०१६ दरम्यान तळेगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधील कारशेडमध्ये घडली. कौटुंबिक वादाला कंटाळून पीडित मुलगी बारामतीहून मुंबईला गेली होती. परतीच्या प्रवासात ती रात्री चुकून तळेगाव रेल्वे स्थानकावर उतरली. तिचा गैरफायदा घेऊन पार्किंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपींनी तिच्यावर वारंवार सामूहिक अत्याचार केले होते.
अकरा जणांच्या साक्षींची नोंद
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शमसुद्दीन शेख यांनी तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. या खटल्यात विशेष सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी अकरा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. आरोपींनी दंडाची रक्कम भरल्यानंतर ती पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
शेतकऱ्यांवरून Gulabrao Patil यांचं वादग्रस्त विधान, ‘वीजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल…’
छ. संभाजीनगरात खून करणाऱ्या जावयाला जन्मठेप
दुसरीकडे, पत्नीला नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून जावयाने सासऱ्याच्या छातीत चाकू भोसकून खून केला. ही घटना १५ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगापुऱ्यात घडली होती. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर सोनवणे यांच्या कोर्टात खून करणाऱ्या मनोज गठोरसिंग (वय २९) याला जन्मठेप व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
सुभाष भगोरे यांची मुलगी जयश्रीचा विवाह मनोज गठोरसिंग याच्याशी झाला होता. बेरोजगार पतीसह वाद, आणि मानसिक त्रासामुळे जयश्री माहेरी औरंगपूर (करमाड) येथे राहत होती. पत्नीला परत नेण्यासाठी मनोज काही दिवसांपूर्वी सासरी आला होता. १५ एप्रिल २०२५ रोजी मनोज पुन्हा पत्नीला घेऊन जाण्यासाठी आला. त्या वेळी वादावादी झाली. मनोज याने सुभाष यांच्यावर चाकूने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला होता. Crime News : पतीचे परस्त्रीशी संबंध, बाळंतीणीने मृत्यूला कवटाळलं, बॉडीशेजारी सात महिन्यांचं तान्हं बाळ शांत निजलेलं तत्कालीन उपनिरीक्षक भारत निकाळजे यांनी आरोपपत्र दाखल केले. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी नऊ जणांची साक्ष तपासली. त्यांना ॲड. आसावरी जोशी व ॲड. दामिनी थोटे यांनी सहकार्य केले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा