![]()
स्वतःची सावली पाहून आनंद होणे ही समजूतदारपणाची गोष्ट आहे.पण तिची भीती वाटणे हा अज्ञानाचा भाग आहे. कारण सावलीचेअस्तित्व हे देहामुळेच असते. मात्र सावलीलाच देह समजण्याची चूकझाली की, भ्रमाला सुरुवात होते. गोस्वामी तुलसीदासांनी प्रभूश्रीरामांच्या बाललीलेतून हा जीवनसंदेश दिला ते म्हणतात— “रूपरासि नृप अजिर बिहारी, नाचहिं निज प्रतिबिम्ब निहारी. ’राजादशरथांच्या अंगणात विहार करणारे श्रीराम स्वतःचे प्रतिबिंब पाहूनआनंदाने नाचतात. वरवर ही बाललीला असली तरी तिच्यामागेतत्त्वज्ञान आहे. अनेकजण सावली बघण्यात आयुष्य घालवतात. चारप्रकारच्या लोकांचे निरीक्षण करा. पर्यटक वेळ घालवण्यासाठी पाहतो.प्रवासी नव्या गोष्टींचा शोध घेतो. भाविक तीर्थक्षेत्राच्या अनुभूतीततल्लीन होतो. तर चौथा माणूस या तिघांकडून कोणत्या गोष्टीला खरेमानायचे, हे शिकतो. सावलीला नव्हे तर मूळ अस्तित्व जाणून प्रयत्नकरा.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सावलीला सत्य समजू नका; मूळ अस्तित्व समजून घ्यावे
