Headlines

Pune Shaniwarwada Water System Restart Decision of Central Archaeological Department; पुण्यातील शनिवारवाड्याला नवं रुप येणार, पेशवेकालीन कामाचं उत्खनन होणार; शनिवारवाड्यातील ‘हजारी कारंजा’ पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर


Pune Shaniwarwada Water Management : ‘यापूर्वीच्या संशोधनातील जुने नकाशे आणि तक्ते पाहिल्यास शनिवारवाड्यातील काही जलवाहिन्या निकामी झाल्या असण्याची, काही बुजल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलवाहिन्यांचे उत्खनन करुन पहिल्या टप्प्यात आराखडा जाणून घेणार आहोत. त्यानंतर संवर्धन सुरु होईल. त्यासाठी आम्ही केलेल्या प्रस्तावावर कार्यादेश प्रसिद्ध झाला आहे. काम पुढे सरकेल तसा केंद्राकडून निधी मिळणार आहे’, असं केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहायक गजानन मांडवरे यांनी म्हटलं आहे.

Pune Shaniwarwada Hazari Fountain
पुणे शनिवारवाडा हजारी कारंजा पुन्हा सुरु होणार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : तत्कालीन पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या शनिवारवाड्यामध्ये पेशव्यांनी अडीचशे वर्षांपूर्वी जल व्यवस्थापन कसे केले, हजारी कारंजामध्ये पाणी कसे फिरवले होते. कात्रजवरून आणलेले पाणी शनिवारवाड्याला वर्षभर पुरायचे का, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊन बंद पडलेली यंत्रणा पूर्ववत करण्याचा निर्णय केंद्रीय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. या कामासाठी केंद्राकडून कार्यादेश मिळाला असून, पावासाचा अंदाज घेऊन शनिवारवाड्यात जल व्यवस्थापनासाठी उत्खनन करण्यात येणार आहे.

पाण्यावर मोठे कारंजेही बांधलेले

शनिवारवाड्यामध्ये सुरुवातीला पाण्याचा कायमस्वरूपी पुरवठा नव्हता. त्या काळात इतरत्र राबविल्या गेलेल्या नळ योजनांच्या धर्तीवर नानासाहेब पेशवे यांनी कात्रज गावाजवळ दोन धरणे बांधली. कृत्रिम तलाव बांधून तंत्रशुद्ध पद्धतीने नळयोजना राबवली आणि वर्षभर पाणीपुरवठा होईल, अशा पद्धतीने शनिवारवाड्यापर्यंत पाणी आणले. नियोजनपूर्वक, कौशल्याने हे पाणी संपूर्ण वाड्यात फिरविण्यात आले. या पाण्यावर मोठे कारंजेही बांधले होते. आता हे कारंजे बंद असून, वाड्यातील जलस्रोत व्यवस्थापनही कार्यरत नाही.
Maharashtra TimesNagpur News : मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आसुसलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वे अन् एसटीची आषाढीची वारी, गावातून थेट विठूरायाकडे

हजारी कारंजाचेही पुनरुज्जीवन

शनिवारवाड्यातील ‘हजारी कारंजा’ ही आकर्षक आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली वास्तू आहे. सवाई माधवरावांच्या मनोरंजनासाठी नाना फडणवीस यांनी हे कारंजे बांधून घेतले होते. ते सोळा पाकळ्यांच्या कमळाच्या आकारातील असून, प्रत्येक पाकळीत १६ तोट्या (जेट्स) होत्या. अशा एकूण २५६ तोट्यांमधून पाणी उडत असे. कात्रज तलावातून आणलेल्या पाण्यावर ते चालत असे. त्याचे पुनरुज्जीवन होणार आहे.

दरवाजांचीही डागडुजी

शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार, दिल्ली दरवाजाच्या संवर्धनाचा निर्णयही पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. शनिवारवाड्याला दिल्ली दरवाजासह मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा असे पाच दरवाजे आहेत. ऊन-वारा पावसामुळे दिल्ली दरवाजाच्या डागडुजीची गरज आहे. दरवाजाच्या कमानीलगतच्या दगडांमधील सांधे सैल झाले आहेत. संवर्धन कामासाठी निविदा काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहायक व संवर्धनतज्ज्ञ गजानन मांडवरे यांनी दिली.
Maharashtra TimesMaharashtra Weather Forecast: मुंबईसह राज्यातील ४ जिल्ह्यांसाठी ३ तास धोक्याचे, अतिमुसळधार पाऊस बरसणार; IMD चा ताजा अंदाज

काम कोण करणार?

केंद्रीय पुरातत्व विभागाचे तज्ञांचे पथक हे काम करणार आहे.

वाड्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या संवर्धनाच्या कामात जलस्त्रोतांवर काही काम झाले नव्हते.

त्यामुळे पुरातत्त्व विभागातर्फे शनिवारवाड्यातील जल व्यवस्थापन आणि संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा