Pune Sarola Village Husband Killed Wife Boyfriend in Front of Wife; प्रेयसीला लेकरासोबत पळवून आणलं, नवऱ्यानं धावत येत बायकोसमोर प्रियकराला संपवलं; पुण्यात रात्री काय घडलं?
Pune Sarola Village Husband Killed Wife Boyfriend in Front of Wife; प्रेयसीला लेकरासोबत पळवून आणलं, नवऱ्यानं धावत येत बायकोसमोर प्रियकराला संपवलं; पुण्यात रात्री काय घडलं?
Pune Crime News : पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा या गावात एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या थरारक हत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सारोळा तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) गावात काल गुरुवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. महिला आणि एका लहान मुलासोबत पायी चालत असतानाच हा धक्कादायक प्रकार घडल्यानं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घटनेनंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोराला स्थानिक ग्रामस्थ आणि राजगड पोलिसांनी पाठलाग करून तत्काळ पकडलं.
धारदार चाकूने तरुणावर सपासप वार
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मृत तरुण एका महिलेसह आणि लहान मुलासह रस्त्यावरून जात होता. यावेळी मागून दबा धरून आलेल्या हल्लेखोराने अचानक त्याच्यावर झडप घातली. काही कळण्याच्या आतच त्याने हातातील धारदार चाकूने तरुणावर एकामागोमाग एक सपासप वारकेले. गंभीर जखमी झालेला तरुण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच जीव गेला. डोळ्यांसमोर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे सोबत असलेली महिला आणि बालक प्रचंड दहशतीखाली आले आहेत.
हल्ला करून पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोराचा स्थानिकांनी पाठलाग सुरू केला. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पथकही घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. महामार्गालगत असलेल्यासीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण थरारक प्रकार कैद झाला असून, फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जुना वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य काही कारण आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. राजगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
डक्टमध्ये गुदमरुन 2 कामगारांचा करुण अंत
‘बीएसएनएल’च्या भूमिगत निरीक्षण डक्टमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना निगडी प्राधिकरणात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. गेल्या वर्षी याच डक्टमध्ये उतरलेल्या तिघांचा मृत्यू झाला होता. हे कामगार आपले नसल्याचे ठेकेदार आणि बीएसएनएल या दोघांनीही म्हटल्यामुळे ते नक्की कोणाचे याचे गूढ वाढले आहे.
मनोज बाबूराव शिंदे (वय २६) आणि अमोल अशोक शिंदे (वय २०, दोघे रा. नाशिक जेलरोड, नाशिक, मूळ रा. सिद्धेश्वर, जि. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत. डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता, विषारी वायू किंवा अन्य कारणामुळे दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल. या डक्टमध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी फायबरचे काम करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा