Headlines

Pune polices and fda major action 13 arrested 500 liters of chemicals found in 1000 liters of milk; पुणे पोलिसांकडून भेसळखोरांचं मोठं रॅकेट उघड, १३ जणांना बेड्या; १ हजार लिटर दुधात ५०० लिटर केमिकलचे दूध


पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यापासून राज्यभरात भेसळखोरांवर धाडसत्र सुरू आहे. अशातच आज पुणे स्थानिक गुन्हे शाखने एकाच वेळी पाच जिल्ह्यांत कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर, सांगली, मंचर, सिल्लोड, अकलूज या परिसरात ही कारवाई करण्यात आली असून १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच तब्बल अडीच ते तीन कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटबाबत पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाला टीप मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्यासह इतर अधिकारी असे ३० जणांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे २० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाच जिल्ह्यांमध्ये धाडी टाकल्या. या धाडीमध्ये दूध भेसळीचे पुण्यातील मंचर हे मुख्य केंद्र असल्याचे आढळून आले. एक हजार लिटर दुधात ही टोळी ५०० लिटर केमिकलच्या साहाय्याने तयार केलेले दूध मिसळत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

दरम्यान, भेसळ करणारे हे नराधम दुधात शाम्पू आणि दूध पावडरचा वापर करत असल्याचं आढळून आलं आहे. याद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याने आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सिन्नर तालुक्यातही ‘एफडीए’चे छापे

अन्नभेसळीविरोधात राज्यभर सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने शनिवारी सिन्नर तालुक्यातील शहा, कारवाडी, पुतळेवाडी आणि विघनवाडी परिसरात छापेमारी केली. दूध संकलन केंद्रे आणि खवानिर्मिती केंद्रांवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून एफडीएच्या पथकाने सिन्नर तालुक्यात धडक देत दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली. दुधामध्ये पावडर किंवा अन्य पदार्थांची भेसळ होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. कारवाईदरम्यान विविध ठिकाणांहून नमुने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. काही साहित्यही जप्त करण्यात आल्याचे समजते. मात्र, कोणते किती नमुने घेतले याबाबतची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. या कारवाईसाठी वावी पोलिस ठाण्याकडून दोन पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. शहा गावात कारवाई सुरू असल्याचे समजताच काही किराणा दुकाने, पानटपऱ्या तसेच खाद्यपदार्थ विक्रीची आस्थापने दिवसभर बंद राहिल्याचे दिसून आले. या संदर्भात प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत