Headlines

Pune Nashik Semi High Speed ​​Railway Project Cancelled Government Stamps Remain on Farmers Satbara; कर्जही मिळेना अन् विकताही येईना; प्रकल्प रद्द पण सातबाऱ्यावर शिक्के कायम, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे शेतकरी हवालदिल


Pune-Nashik Semi High Speed ​​Railway Project : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सरकारने शिक्के मारून ठेवले आहेत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

Pune-Nashik Semi High Speed Railway Project
पुणे नाशिक रेल्वेमार्ग शेतकरी सातबारा शिक्के(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
सुषमा नेहरकर, राजगुरुनगर : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता खेड, आंबेगाव, जुन्नरऐवजी अहिल्यानगर, शिर्डी ते नाशिक असा वळविण्यात आला आहे; परंतु पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने नुसतेच प्रकल्पांचे शिक्के मारून ठेवले आहेत. यामध्ये खेड सेझ, चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ, भामा आसखेड प्रकल्प आणि आता पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे शिक्के. या सरकारी प्रकल्पांच्या शिक्क्यांमुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ना पीक कर्ज मिळते, ना जमिनीवर काही व्यवहार करता येत. प्रकल्प रद्द झाल्याने जमिनीचा मोबदलादेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकार आमचा किती अंत पाहणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग

पुणे जिल्ह्याच्या विकासात खूप मोठी भर टाकणार व नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील कृषी व औद्योगिक वाहतुकीसाठी चालना देण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जात होते. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी या तीन्ही जिल्ह्यांतील जमीन संपादित करण्यात येणार होती. यासाठी एकट्या पुणे जिल्ह्यात हवेली, पुणे शहर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील ५४ गावांमध्ये शेतकऱ्यांची सुमारे ४५७.६४ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.
Maharashtra TimesMumbai News: मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था; कधी होणार भूमिपूजन?

सातबाऱ्यावर विमानतळाचे शिक्के तसेच

पुणे जिल्ह्यातील ५४ पैकी ४२ गावांमध्ये जमिनींची मोजणी पूर्ण करून काही शेतकऱ्यांना २५० ते ३०० कोटी रुपयांचे वाटप करून सरकारने जमीन ताब्यात घेतली आहे; परंतु राज्यात फडणवीस सरकार सत्तेवर येताच ही सेमी हायस्पीड रेल्वे खेड, आंबेगाव, जुन्नरऐवजी पुण्यातून वाघोली, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे थेट नाशिकला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीही चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प रद्द करून तत्कालीन फडणवीस सरकारने तो पुरंदर तालुक्यात हलवला. खेड तालुक्यातील अनेक गावांत आजही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विमानतळाचे शिक्के मात्र तसेच आहेत.

आश्वासने देऊनही शिक्के हटलेच नाहीत

शेतीसाठी पाणी मिळेल म्हणून लाखो शेतकऱ्यांनी त्याग करून आपल्या जमिनी भामा आसखेड प्रकल्पासाठी दिल्या. या भामा आसखेड प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र रद्द करून भामा आसखेड प्रकल्पातील पाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी राखीव करण्यात आले. येथे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून तुटपुंजा मोबदला देऊन गप्प करण्यात आले; पण आजही हजारो शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भामा आसखेड प्रकल्पाचे शिक्के कायम आहेत. खेड सेझमध्ये देखील शेतकऱ्यांची फसवणूक झाली, आंदोलन केल्यानंतर काही गावे वगळण्यात आली, पडलेले शिक्के काढून टाकू अशी आश्वासने देण्यात आली, अनेक वर्षे झाली हे शिक्केदेखील सातबाऱ्यावर कायम आहेत. आता पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबतही हाच प्रकार सुरू आहे. यामुळे हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Maharashtra TimesGulabrao Patil : अरे राजा, आधी स्वतःचा आवाज तर सुधार; गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, ठाकरेंचे 14 आमदार फुटण्याचा दावा

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाची सद्यस्थिती

एकूण जमीन संपादित होणारी गावे – ५४

पुणे शहर – ३

हवेली – १२

खेड – २१

आंबेगाव – १०

जुन्नर – ८

मोजणी पूर्ण झालेली गावे – ४२

एकूण खरेदीखत – हवेली, खेड आणि आंबेगाव तालुक्यांतील काही शेतकऱ्यांना २५० ते ३०० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा