Headlines

Labor Leader Balu Bandgar 14 Year Old grandson shot dead in sangli


सांगलीत एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा भयानक गोळीबाराचा थरार बघायला मिळाला आहे. कुख्यात गुन्हेगारांनी एका कामगार नेत्याच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात कामगार नेत्याच्या निष्पाप नातवाचा खून झाला आहे.

Sangli News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली : सांगली शहरामध्ये खंडणीच्या वादातून एका 14 वर्षीय मुलाचं डोक्यात गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत बंडगर असं मृतक अल्पवयीन मुलाचं नाव आहे. वेदांत याच्या डोक्यात गोळी झाडून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. वेदांत बंडगर याचे आजोबा बाळू बंडगर हे कामगार नेते असल्याची माहिती समोर येत आहे. बाळू बंडगर आणि त्यांचे थोरात नामक साथीदार यांच्याकडे खंडणी मागण्यासाठी सांगलीतील एक सराईत गुन्हेगार गेला होता. या गुन्हेगाराने जतमध्ये राहणाऱ्या थोरात नामक व्यक्तीच्या घरामध्ये घुसून खंडणी मागितली होती. घरात घुसून खंडणी मागितल्याने सराईत गुन्हेगाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी बाळू बंडगर आणि त्यांचे साथीदार थोरात हे दोघे जत पोलीस ठाण्यात गेले होते. याचा राग सराईत गुन्हेगाराच्या मनामध्ये होता.

सराईत गुन्हेगाराने याच रागातून गुरुवारी सकाळी जतमध्येच बंडगर आणि थोरात या दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण तोपर्यंत त्याचा डाव फसला. त्यानंतर तो सांगली शहरातील अभयनगर परिसरामध्ये असणाऱ्या बंडगर यांच्या घरामध्ये गेला. यावेळी बाळू बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर हा घराबाहेर मोबाईलवर गेम खेळत असताना सराईत गुन्हेगाराने पाहिले. या गुन्हेगाराने यावेळी मागचापुढचा कुठलाही विचार न करता 14 वर्षाच्या वेदांतच्या डोक्यामध्ये गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील टेंडर घेण्याच्या वादातून तसेच थोरात यांच्याकडून खंडणी मागण्याच्या वादातून हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. सराईत गुन्हेगाराने पाच ते सात जणांच्या मदतीने ही हत्या केली. त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा, संजयनगर पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. तरुणाची हत्या केल्या प्रकरणी सांगलीत एकच खळबळ उडाली आहे.

सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी काय म्हणाले?

या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अभयनगर परिसरात बाळासाहेब बंजगर यांचा नातू वेदांत बंडगर याचा गोळीबारात खून झाला आहे. आरोपी एका गाडीमध्ये आले, चार आरोपी होते असे सांगण्यात येत आहे. त्यांनी गाडीमधून येऊन घराच्या दिशेला गोळीबार केला. या गोळीबारात 14 वर्षांच्या वेदांतच्या उजव्या डोळ्यांत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे”, अशी प्रतिक्रिया तुषार दोशी यांनी दिली.

“पुढील तपास संजयनगर पोलीस करत आहेत. तपासासाठी विविध तपास पथके संशयित आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत. आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही नाकाबंदीसाठी सतर्क करण्यात आलं आहे. पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत. प्रथमदर्शनी काहीतरी व्यवसायिक वाद होता. पण या प्रकरणी प्रथम फिर्याद दाखल होणं बाकी आहे. फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातून हत्येमागील कारण समोर येईल”, अशी माहिती तुषार दोशी यांनी दिली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा