Headlines

Pune Municipal Corporation Shyama Prasad Mukherjee Resolution NCP Amol Balwadkar; ‘श्यामाप्रसाद मुखर्जींवर 10 मिनिटे बोला’; अमोल बालवडकरांनी विरोधकांना कोंडीत पकडलं, भाजप नगरसेवकांची बोबडी वळली, पुणे पालिकेत काय घडलं?


Corporator Amol Balwadkar : प्रभागातील विकास कामांचा निधी शून्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर हे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. बालवडकर यांनी दिलेल्या एका उपसूचनेवरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोंडी झाली.

Pune Municipal Corporation Shyama Prasad Mukherjee Resolution NCP Amol Balwadkar
पुणे महानगरपालिका अमोल बालवडकर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगरसेवक अमोल बालवडकर आणि भाजप नेत्यांमधील संघर्ष काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. भाजपचे तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील टिकेनंतर बालवडकर यांचा निधी महापालिकेतून शून्य करण्यात आला होता. हे प्रकरण थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे राज्यात मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीत पुण्यात मोठा वाद झाला होता. त्यानंतर आता अमोल बालवडकर यांनी पुन्हा एकदा भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं आहे.

महापालिकेत मोठा गदारोळ

पुणे महापालिकेतील सर्वसाधारण सभेत भारताचे माजी उद्योग आणि पुरवठामंत्री श्यामाप्रसाद मुखर्जीयांचे तैलचित्र महापालिकेत लावावे आणि दरवर्षी त्याला पुष्पहार अर्पण करण्यात यावा. असा प्रस्ताव महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेविका अर्चना पाटील यांनी मांडला होता. हा प्रस्ताव मांडताच अमोल बालवडकर यांनी या प्रस्तावाला एक उपसूचना मांडली. यामध्ये त्यांनी ‘मुखर्जी हे भारताच्या अखंडतेसाठी बलिदान देणारे, 370 कलमला सर्वप्रथम विरोध करणारे आणि एक देश में दो विधान, एक देश में दो निशान, एक देश में दो प्रधान नहीं चलेंगे’ अशी घोषणा देणारे राष्ट्रभक्त होते. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाने 10 मिनिटे बोलायला हवे, जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांना ती मिळेल’, असं म्हटलं. त्यानंतर ही उपसूचना उपरोधिक असल्याचं भाजप नगरसेवकांचं म्हणणं होतं. त्यामुळे यावरून मोठा गदारोळ महापालिकेत झाला.

Maharashtra TimesTukaram Mundhe : पाच मित्र रेस्टॉरंटमध्ये बसले, वेटरला एकच प्रश्न विचारला, तोच तुकाराम मुंढेंचं दर्शन घडलं, व्हिडिओला नेटिझन्सची पसंती

भाजपला पुन्हा एकदा कोंडीत पकडलं

अमोल बालवडकर यांच्या उपसूचनेनंतर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अमोल बालवडकर यांच्या या उपसूचनेचा निषेध केला आणि ‘आमच्या पक्षाचे नेते आणि जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांची तुम्हाला चेष्टा करायची असेल, तर मी तुमचा निषेध करतो’, असं म्हटलं. मात्र, अमोल बालवडकर यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर 10 मिनिटं बोलण्याचं जे चॅलेंज दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी भाजपचा एकही नगरसेवक पुढे आला नाही. अखेर सभागृहातील प्रचंड गोंधळानंतर अमोल बालवडकर यांनी त्यांची उपसूचना मागे घेतली. मात्र, यामुळे अमोल बालवडकर यांनी भाजपला पुन्हा एकदा चांगलच कोंडीत पकडल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra TimesOBC Morcha: सरकारची डोकेदुखी वाढणार; आरक्षण नव्हे, वेगळ्या मुद्द्यावर निघणार ओबीसींचा महामोर्चा, वडेट्टीवार-जानकरांकडून कोणती घोषणा?

कोण होते डॉ. मुखर्जी?

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर आणि प्रखर राष्ट्रवादी नेते होते. ते आजच्या भारतीय जनता पक्षाचे मूळ असणाऱ्या असलेल्या भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉ. मुखर्जी यांना उद्योग आणि पुरवठा मंत्री बनवण्यात आलं होतं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा