Headlines

तिबेटमधून आलेल्या पुराने नेपाळमध्ये अक्षरशः हाहाकार:अनेक गावांत शिरले पाणी, पूल तुटले-वाहने वाहून गेली; 9 पोलिस कर्मचारी बेपत्ता




चीनच्या तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. भोटेकोशी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे टिमुरे आणि स्याब्रुबेसी परिसरातील अनेक घरे, बाजारपेठा आणि इतर मालमत्तांचे भयंकर नुकसान झाले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहने आणि वस्तू वाहून गेल्या. तसेच एक पूलही जमीनदोस्त झाला. पूर आल्यानंतर टिमुरे सीमा चौकीवर तैनात असलेले 9 पोलीस कर्मचारी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पूर आल्यापासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, सीमा चौकीवर उपस्थित असलेले इतर 25 ते 30 जण सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुराशी संबंधित फुटेज हेलिपॅड वाहून गेला, मदतकार्यास गेलेले हेलिकॉप्टरला परतले रसुवा येथील टिमुरेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पाठवलेले हेलिकॉप्टर न उतरताच काठमांडूला परत आले. पुराच्या पाण्यात स्थानिक हेलिपॅड वाहून गेले होते. त्यामुळे वैमानिकाला उतरण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली नाही. वैमानिकाने काठमांडू पोस्टला सांगितले की, वरून पाहिल्यावर टिमुरे गावाचा एक मोठा भाग दिसत नव्हता. ते म्हणाले की, एखाद्या बंद नदीचे पाणी अचानक बाहेर पडावे, त्याप्रमाणे त्रिशूली नदीचे पाणी अचानक खूप वेगाने वाढले. पूर आणि भूस्खलनामुळे टिमुरेमध्ये मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. या अस्मानी संकटात नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला किंवा किती नुकसान झाले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुरामुळे जलविद्युत प्रकल्पही वाहून गेला रसुवामध्ये अचानक आलेल्या पुराच्या जोरदार प्रवाहामुळे एक जलविद्युत प्रकल्प वाहून गेला, तर चिलिमे जलविद्युत प्रकल्पासह इतर काही प्रकल्पांनाही नुकसान झाले आहे. पुरामुळे एकूण किती नुकसान झाले आहे, याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. विशेष बाब म्हणजे रसुवा जिल्हा मुख्यालयाच्या आसपास पाऊस झाला नव्हता. तरीही भोटेकोशी नदीत अचानक पाणी वाढले. अधिकाऱ्यांच्या मते, पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उंच प्रदेशातील हिमनदीच्या तलावातील पाणी अचानक बाहेर पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु याची पुष्टी झालेली नाही. लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला भोटेकोशीमध्ये पाणी वाढल्यानंतर पुढे त्रिशूली नदीतही पुराचा धोका वाढला आहे. रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा आणि चितवनमधील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा आणि धोका वाढल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्रिशूली नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना नदीत जाणे, मासे पकडणे आणि किनारी काम करणे टाळण्यास सांगितले आहे. पंतप्रधान बालेन यांचे लष्कर तैनात करण्याचे आदेश नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी रसुवा येथील पूरग्रस्त भागांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी नेपाळी सेना, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रभावित भागांमध्ये इतर जिल्ह्यांतूनही अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. प्रभावित भागांमध्ये अतिरिक्त रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारीही पाठवले जात आहेत. बालेन यांनी नदीकाठच्या सखल भागांत राहणाऱ्या लोकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या वर्षीही भोटेकोशीला पूर आला होता भोटेकोशी नदी तिबेटमधून नेपाळमध्ये येते आणि पुढे सुनकोशी नदीला मिळते. हीच सुनकोशी नदी पुढे सप्तकोशी (कोसी) नदी बनते, जी भारतात बिहारमध्ये प्रवेश करते. गेल्या वर्षीही भोटेकोशीला आलेल्या पुरामुळे नेपाळचे मोठे नुकसान झाले होते. त्या दुर्घटनेत 9 लोकांचा जीव गेला होता, तर 24 लोक बेपत्ता झाले होते. नेपाळ आणि चीनला जोडणारा फ्रेंडशिप ब्रिजही पुरात वाहून गेला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील रस्ते संपर्क आणि व्यापार अनेक महिने बाधित राहिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत