Pune Mumbai Railway Traffic Closed Today 14 Major Trains Cancelled 13 Trains Diverted; पुणे-मुंबई रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट; 13 गाड्यांचे मार्ग बदलले, प्रमुख 14 गाड्या रद्द, रेल्वेमार्ग कधी सुरु होणार?
Pune Mumbai Railway Traffic Closed Today 14 Major Trains Cancelled 13 Trains Diverted; पुणे-मुंबई रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट; 13 गाड्यांचे मार्ग बदलले, प्रमुख 14 गाड्या रद्द, रेल्वेमार्ग कधी सुरु होणार?
Pune Mumbai Railway News : ‘कर्जत आणि लोणावळ्यादरम्यान घाट परिसरात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. त्या मार्गाचे काम पूर्ण राहणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा बंद राहण्याची शक्यता आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत’, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी म्हटलं आहे.
पुणे रेल्वेमार्ग कधी सुरु होणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : घाट परिसरातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळित होती. रेल्वे मार्गाची दुरुस्ती न झाल्यामुळे मंगळवारी १४ रेल्वे गाड्या रद्द झाल्या आणि १३ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले. आज, बुधवारीही पुणे-मुंबई रेल्वे बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
दैनंदिन प्रवाशांच्या प्रमुख १४ गाड्या पूर्णपणे रद्द
मुंबई-धुळे एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-सोलापूर, भुज-पुणे, सातारा-दादर एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली. सीएसएमटी- कोल्हापूर एक्स्प्रेस ही गाडी सीएसएमटी ते खडकी दरम्यान रद्द केली असून, ती खडकी येथून आपल्या निर्धारित वेळेनुसार सुटली. एकूण १३ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत आणि आठ गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
कर्जत-लोणावळ्यादरम्यान दरड कोसळून रेल्वे वाहतूक विस्कळित झाल्याने प्रवास रद्द करावा लागलेल्या प्रवाशांना मध्य रेल्वेकडून एका दिवसात ७९ हजार ७४७ प्रवाशांना एकूण ५.९१ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. पुणे विभागात २० हजार ९८२ प्रवाशांना १.५६ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा