Headlines

Pune Junnar Naneghat 23 Year Old Datta Londhe Died Falling into Valley; पर्यटनाला गेला, अर्ध्यातूनच माघारी, मित्रांना पुन्हा दिसलाच नाही, वाटेत चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा; नाणेघाटात तरुणाचा थरारक अंत


Pune Naneghat Youth Dies Falling Valley : पावसाळी पर्यटनासाठी नाणेघाटात गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. दत्ता विनायक लोंढे असं मृत तरुणाचं नाव असून, त्याचा मृतदेह मंगळवारी शोधून काढण्यात मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमला यश आलं आहे.

Pune Junnar Naneghat 23 Year Old Datta Londhe Died Falling into Valley
नाणेघाट तरुणाचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळ सीमेवर असलेल्या नाणेघाट परिसरातील ‘नानाचा अंगठा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंगरावर पर्यटनासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका 25 वर्षीय तरुणाचा भीषण अपघात झाला. तिथे फिरताना अचानक पाय घसरून खोल दरीत कोसळल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल दोन दिवस चाललेल्या अत्यंत खडतर शोधमोहिमेनंतर मंगळवारी सकाळी मुरबाड येथील सह्याद्री गिरी रेस्क्यू टीमने या तरुणाचा मृतदेह दरीतून यशस्वीपणे बाहेर काढला.

आपण परत खाली जात असल्याचं सांगितलं

दत्ता लोंढे (वय 22, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असं या अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दत्ता लोंढे हा त्याचे मित्र तेजस काटे (वय 25), सुनील पवार (वय 23) आणि अनिकेत ढोबळे (वय 22) या तीन मित्रांसोबत पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नाणेघाट परिसरात गेला होता. चौघेही मित्र नानाचा अंगठा डोंगरावर चढाई करत असताना अर्ध्या वाटेवर पोहोचले. त्यावेळी दत्ता लोंढे याने आपण परत खाली जात असल्याचं उर्वरित मित्रांना सांगितलं आणि तो एकटाच माघारी निघाला. मात्र, बराच वेळ उलटून गेल्यानंतरही दत्ता पार्किंगच्या ठिकाणी परत पोहोचलाच नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या त्याच्या मित्रांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात तातडीने शोध सुरू केला. तरीही त्याचा काहीच सुगावा न लागल्यानं अखेर या घटनेची माहिती जुन्नर पोलिसांना देण्यात आली.
Maharashtra TimesPune News : ‘आईssबाबाss’; कुटुंबासोबत गाढ झोपेत, भल्या पहाटे बिबट्याची झडप, आई-बापासमोर चिमुकलीला शेतात ओढलं; पुण्यात लेकीचा करुण अंत

अडथळ्यांमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी

घटनेचं गांभीर्य ओळखून जुन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, वनविभाग आणि स्थानिक रेस्क्यू पथकानं तातडीनं संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. मात्र, परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे दरीतील परिसर स्पष्ट दिसत नव्हता. या निसर्गाच्या अडथळ्यांमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
Maharashtra TimesWeather Update: पुण्यात पावसाने मोडला १२ वर्षांचा विक्रम, घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’; चार दिवस राज्यात पाऊस थैमान घालणार

माती घसरल्याच्या खुणा

शोधादरम्यान टीमला अर्ध्या वाटेवर दत्ता लोंढे याची एक चप्पल आणि दरीच्या दिशेने माती घसरल्याच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या. यावरूनच तोल जाऊन तो थेट खोल दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. अखेर सह्याद्री गिरी रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा