Headlines

Pune Indapur Mentally Unstabale Minor Girl was Abused Shocking Act by Grandfather of Family; जबरदस्ती हात-पाय दाबून घेतले, गतिमंद अल्पवयीन नातीवर अत्याचार, नको त्या जागी स्पर्श; घरातल्या आजोबांचाच कांड


Pune Indapur Minor Girl Abused : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच इंदापूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Pune Indapur Minor Girl Abused
इंदापूर गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (इंदापूर) : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादलवाडी येथे गतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भिगवण पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तातडीनं अटक करण्यात आली आहे.

नको त्या जागी स्पर्श

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव शिवाजी चंद्रकांत दणाणे (वय 67, रा. भादलवाडी) असं आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा चुलता असल्यानं मुलीच्या नात्यानं आजोबा लागतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला मुलगी अल्पवयीन आणि गतिमंद असल्याची पूर्ण कल्पना असतानाही त्याने घरात तिच्याकडून हात-पाय दाबून घेतलं. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीरावर नको त्या जागी स्पर्श करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
Maharashtra TimesNanded Crime : MPSC टॉपर, तरी DCM जिल्हा दौऱ्यावर असताना लाचेची मागणी, 45 लाख घेताना सापडला; क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
घडलेला प्रकार मुलीच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिने तातडीने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पॉक्सोसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मंगेश जगताप प्रकरण अपडेट, न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी मंगेश जगताप यांच्याविरुद्ध एका तरुणीच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जगताप यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना आज अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Maharashtra TimesTanmay Wange : पुण्यातील MBBS चा विद्यार्थी 14 दिवसांपासून बेपत्ता, आई रुग्णालयात, हॉस्टेलवर रॅगिंग झाल्याचा आरोप
तक्रारदार तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दीर्घकाळ लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी संबंध ठेवण्यात आले. विश्वास संपादन करून तिची फसवणूक करण्यात आली तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार झाल्याचा आरोप तिने केला आहे. सुरुवातीला हा गुन्हा पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. पुढील तपासासाठी संबंधित अधिकारक्षेत्र माळेगाव पोलीस ठाणे असल्याने तो माळेगावकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान आज न्यायालयाने जगताप यांना जामीन मंजूर केला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा