Baramati News: प्रत्यक्षात अनेक एजन्सीकडे नोंदणी प्रमाणपत्र नाही. उपविभागीय किंवा विभागीय संबंधित यंत्रणेकडे त्यांची स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

पैसे देण्यास नकार दिल्यास ‘कंपनीतून काढून टाकू, पुढे कोणत्याही कंपनीत नोकरी मिळू देणार नाही,’ अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, नोकरी जाण्याच्या भीतीने तक्रार करण्यास युवक धजावत नाही.
Uday Samant: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी निधीचा पाऊस; 18 कोटी देण्याची मंत्री सामंत यांची घोषणाबारामती शहर व परिसरात सुमारे आठ खासगी प्लेसमेंट एजन्सी कार्यरत आहेत. या एजन्सीकडून सुरुवातीला नोंदणी शुल्क, प्रोसेसिंग फी, मुलाखत शुल्क आकारले जाते. त्यानंतर नोकरी लागल्यानंतर पहिल्या पगारातील अर्धी रक्कम देण्याचे ठरते. नोकरी करून संबंधित कंपनी किंवा काही खासगी ठिकाणी दोन ते तीन महिने पगार वेळेवर मिळत नाही. काही लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये तर नियुक्तीपत्र न देता काम करून घेतल्याचे काही युवकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.
नोकरीच्या आशेने अनेक तरुण या एजन्सीकडे जातात. मात्र, नोकरी लागल्यानंतर त्यांच्याकडून विविध नावाखाली पैसे उकळले जातात. पुन्हा बेरोजगार होण्याची भीती आणि त्रास टाळण्यासाठी पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस करीत नसल्याचे वास्तव आहे.
Pune News: दिल्ली आंदोलनातील दगडांवरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार; धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी
बारामतीमधील सर्वच प्लेसमेंट एजन्सी बेकायदेशीर आहेत, असे म्हणता येणार नाही; मात्र, महाराष्ट्र खासगी पदयोजन एजन्सी (विनियमन) अधिनियम, २०२५ लागू झाल्यानंतर प्रत्येक खासगी प्लेसमेंट एजन्सीने संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी नाही ?
राज्यात खासगी प्लेसमेंट एजन्सींच्या नियमनासाठी कायदेशीर चौकट तयार झाली असली, तरी तिची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून केला जात आहे. आवश्यक नोंदणी, पारदर्शक करार आणि नियमांचे पालन न करता काही एजन्सी व्यवसाय करीत असल्याने बेरोजगार युवकांची फसवणूक वाढत आहे.
Pune Cyber Crime: काही हजारांचा मोह, जेलवारी नक्की! पुण्यात ‘म्युल अकाउंट’प्रकरणी 15 दिवसांत 60 जणांवर गुन्हे
युवकांनी काळजी घ्यावी
-एजन्सीकडे नोंदणी प्रमाणपत्र आहे का ?
-संबंधित कंपनीचा एमसीए/सीआयएन क्रमांक तपासा.
-मोठी रक्कम आगाऊ मागितल्यास सावध राहा
-पावती, लेखी कराराशिवाय कोणतेही पैसे देऊ नका
-नियुक्तीपत्र मिळाल्याशिवाय काम सुरू करू नका.
नोकरीच्या आमिषाने आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडणे, धमकावणे किंवा फसवणूक करणे हा गंभीर प्रकार आहे. अशा प्रकारचा अनुभव कोणालाही आला असेल; तर भीती न बाळगता पुराव्यांसह पोलिसांकडे तक्रार करावी. प्रत्येक तक्रारीची कायदेशीर चौकशी करून दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.– गणेश बिरादार, अपर पोलिस अधीक्षक, बारामती

