Headlines

Pune death of woman and newborn during delivery in maval serious allegations against maymar hospital; पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, काही क्षणांत बाळानेही गमावला जीव; रुग्णालयावर गंभीर आरोप, नातेवाईक संतापले


श्रीकृष्ण पांचाळ, पुणे: प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मृत महिलेचे नाव रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३७, रा. कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) असे आहे. प्रसूतीसाठी त्यांना मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान महिला आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत, मायमर हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. घटनेची माहिती मिळताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. रुग्णांच्या जीवाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, उपचारादरम्यान काही वैद्यकीय त्रुटी झाल्या होत्या का, तसेच या प्रकरणात नेमकी कोणाची जबाबदारी आहे, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, एका मातेचा आणि तिच्या नवजात बाळाचा एकाचवेळी झालेला मृत्यू आणि त्यानंतर नातेवाईकांनी केलेले गंभीर आरोप यामुळे मायमर हॉस्पिटलच्या वैद्यकीय उपचारपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आमदार सुनील शेळके नेमकं काय म्हणाले?

या दुर्दैवी घटनेनंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी संताप व्यक्त केला आहे. “रुग्णाचं हित लक्षात घेऊन आरोग्य सेवा दिली पाहिजे. केवळ पैशांसाठी आरोग्य सेवा दिली जात असेल, तर अशा रुग्णालयावर कारवाई करून ते बंद करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. आज ना उद्या या प्रकरणातील सत्य समोर येईल. पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला, तर या प्रकरणात एसआयटीमार्फत चौकशी लावू. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर आणि संबंधित रुग्णालय या मृत्यूस जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे. ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा तीन ते चार घटना घडल्याची माहिती आमच्यासमोर आली आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात ऑन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतर नेमकं सत्य काय आहे, हे समोर येईल,” असं सुनील शेळके म्हणाले.

दरम्यान, “आईचा आधी मृत्यू झाला होता. त्यानंतर बाळाला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवे होते. बाळाचा जन्म झाला त्यावेळी ते जिवंत होतं की नव्हतं, याबाबतही स्पष्टता नाही. साडेसहा वाजता महिलेचा मृत्यू झाल्यानंतर बाळाला तात्काळ पुण्यातील ससून रुग्णालयात हलवायला हवं होतं. मात्र, रात्री नऊ वाजता बाळाला ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि तिथे बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. हा संपूर्ण प्रकार नातेवाईकांची फसवणूक करणारा असल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात योग्य आणि निष्पक्ष तपास झाला नाही, तर आम्ही एसआयटीमार्फत चौकशी लावणार आहोत. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही,” असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला आहे.

पोलीस काय म्हणाले?

“रुग्णाच्या उपचारासंदर्भातील सर्व कागदपत्रे आम्ही ससून रुग्णालयात दाखल करणार आहोत. त्यानंतर ससून रुग्णालयातील समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. या चौकशीतून नेमकं सत्य काय आहे, हे समोर येईल. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत