Headlines

Pune Daund Sonawanemala Village Two Cousins ​Die of Electric Shock; एकाला अचानक विजेचा धक्का, वाचवण्यासाठी दुसरा भाऊ गेला; पुण्यात दोन चुलत भावांचा करुण अंत


Daund Two Brothers Die of Electric Shock : दौंड तालुक्यातील सोनवणेमळा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे दोन चुलत भावांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Daund Two Brothers Die of Electric Shock
सोनवणेमळा शॉक लागून भावांचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (दौंड) : पुणे जिल्ह्यातील राहू नजीकच्या सोनवणेमळा येथे घरगुती काम करताना विजेचा तीव्र धक्का बसल्यानं ओम नितीन भोईटे (वय 18) आणि रोहित अनिल भोईटे (वय 21) या दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना काल सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सोनवणेमळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणेमळा येथील अनिल भोईटेयांच्या घरात सकाळी घरगुती कामे सुरू होती. त्यावेळी ओम भोईटे याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. भावाला विजेचा धक्का बसल्याचं लक्षात येताच रोहित याने तातडीने त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, ओमला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना रोहितलाही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला. दरम्यान, दोन्ही मुलांना विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांच्या आईनेही मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्या सुदैवाने बचावल्या. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी दोन्ही भावांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं.

Maharashtra TimesNashik Crime : नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतला

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

या घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यवत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. विजेच्या प्रवाहामुळे एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा मृत्यूझाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ओम आणि रोहित हे दोघेही कष्टाळू कुटुंबातील होते. दोन्ही तरुणांचा एकाच दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Maharashtra TimesMumbai News : नार्वेकर, शिंदे, कोकाटे ते दानवे… मनपा इंजिनिअर्सच्या बदली-पदोन्नतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिफारशी, माहिती अधिकारात ‘फील्डिंग’ उघड

रेल्वेपुलाखाली आढळले अर्भक

तांदूळवाडी येथील दादा पाटीलनगर रेल्वे पुलाखाली नवजात बालिका जिवंत आढळली. जन्मानंतर अर्भकाचा त्याग केल्याप्रकरणी अज्ञात पालकांसह जबाबदार व्यक्तींविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी शाहरुख शकील शेख (२६) यांनी फिर्याद दिली. बुधवारी सकाळी सहा वाजता बालिका रडत असल्याची माहिती ‘डायल ११२’वरून पोलिसांना मिळाली. दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा