Headlines

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! दोन एक्स्प्रेस आता नियमित धावणार, कोणत्या स्थानकांवर थांबणार? पाहा वेळापत्रक


Pune Railway: पुणे आणि कोल्हापूर शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-20T085708
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पुणे: पुणे रेल्वे विभागातून धावणाऱ्या पुणे-कोल्हापूर आणि हडपसर-हरंगुळ या दोन विशेष गाड्यांना आता नियमित दैनिक एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे या दोन्ही मार्गांवरील प्रवाशांना नियमित आणि वेगवान रेल्वे सेवेचा लाभ मिळणार आहे.

हडपसर-हरंगुळ ‘ट्रेन ऑन डिमांड’ विशेष गाडी १५ ऑगस्टपासून ‘११४२९/११४३० हडपसर-हरंगुळ-हडपसर एक्स्प्रेस’ या नवीन क्रमांकाने दररोज धावत आहे. गाडी क्रमांक ११४२९ हडपसरहून सकाळी ६:२० वाजता सुटून दुपारी १:०० वाजता हरंगुळला पोहोचेल, तर परतीची ११४३० गाडी हरंगुळहून दुपारी ३:०० वाजता सुटून रात्री ८:४५ वाजता हडपसरला पोहोचेल. या गाडीला उरुळी, दौंड, कुर्डुवाडी, बार्शी आणि धाराशिवसह प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

Maharashtra TimesGanesh Bidkar: पुणे पालिकेत महायुतीत ठिणगी; ‘युती फक्त राज्यात’ म्हणत गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारादुसऱ्या टप्प्यात, पुणे-कोल्हापूर गाडी २० ऑक्टोबरपासून ‘११४१९/११४२० पुणे-कोल्हापूर-पुणे दैनिक एक्स्प्रेस’ म्हणून नियमित होईल. गाडी क्रमांक ११४१९ पुण्याहून रात्री ९:४० वाजता सुटून पहाटे ५:०८ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. परतीची ११४२० गाडी कोल्हापूरहून रात्री ९:५० वाजता सुटून पहाटे ५:१० वाजता पुण्यात येईल.

पवारांचे खासदार PM मोदींना भेटले, राष्ट्रवादी NDA सोबत जाणार? अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करा- डॉ. अमोल कोल्हे

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्या मार्गानेच व्हावा. त्यासाठी पंतप्रधान, रेल्वेमंत्री यांना माहिती दिली. स्थानिक पातळीवर रेल्वे खात्याने सहकार्य करावे. चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथील उद्योग स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर- रांजणगाव एमआयडीसी- चाकण एमआयडीसी- तळेगाव एमआयडीसी ते जेएनपीटी बंदर असा समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर करावा,’ अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठकीत केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा