Headlines

Pune BJ Medical College MBBS Student Tanmay Wange Missing after Ragging in Hostel Crime News; पुण्यातील MBBS चा विद्यार्थी 14 दिवसांपासून बेपत्ता, आई रुग्णालयात, हॉस्टेलवर रॅगिंग झाल्याचा आरोप


Pune Medical College Student Missing : उत्कर्ष सिंग आणि श्रेया यादव यांच्यासह विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने तन्मयचा छळ केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तन्मयच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरुन त्याची वारंवार थट्टा आणि अपमान केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Pune Medical College MBBS Student Tanmay Wange Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील बायरामजी जीजीभॉय (बीजे) मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून वारंवार होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून त्याने वसतिगृह सोडल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी कॉलेजने सहा सदस्यांची समिती स्थापन केली असून पोलीसही विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या ग्रुपने रॅगिंग केल्याचा आरोप

बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव तन्मय वंगे असे आहे. त्याचे वडील अजयकुमार वंगे यांनी पोलीस आणि कॉलेज प्रशासन या दोघांकडेही तक्रार दाखल केली आहे. उत्कर्ष सिंग आणि श्रेया यादव यांच्यासह विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने तन्मयचा छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तन्मयच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरुन त्याची वारंवार थट्टा आणि अपमान केला जात असल्याचा दावा पालकांनी केला आहे.
Maharashtra TimesAtul Chavan : पत्नी भाजप आमदार, PWD तील मुख्य अभियंते अतुल चव्हाणांचा तडकाफडकी राजीनामा, व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

१८ जुलैला हॉस्टेलबाहेर पडला

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, १८ जुलै रोजी हॉस्टेल सोडण्यापूर्वी तन्मयने वसतिगृह प्रशासनाला कळवले होते की तो नातेवाईकांना भेटायला जात आहे. नंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पुणे रेल्वे स्थानकावरुन सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना दिसला. लोणी काळभोर रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर त्याचा मोबाईल फोन अनरिचेबल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

२१ जुलै आणि पुन्हा २३ जुलै रोजी त्याच्या फोनवर इंटरनेटचा वापर झाल्याचे दिसून आले, परंतु त्यानंतर कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. कुटुंबीयांच्या आरोपांनंतर बीजे मेडिकल कॉलेजने कथित रॅगिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती स्थापन केली.

Maharashtra Rainfall : 3 दिवसात चित्र बददलं, IMD Report पावसाची तूट कमी, अनेक जिल्ह्यांना दिलासा

तन्मयचे पिता अजयकुमार वंगे यांनी दावा केला की, समितीचा अहवाल अद्याप कुटुंबीयांना कळवण्यात आलेला नाही. तसेच, या संस्थेत आपल्या मुलांना रॅगिंगचा सामना करावा लागल्याबाबत इतर अनेक पालकांनीही तक्रारी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तन्मयची आई रुग्णालयात

तन्मय बेपत्ता होण्याच्या घटनेचा कुटुंबावर मोठा परिणाम झाला आहे. या घटनेमुळे आलेल्या तणावामुळे तन्मयच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. बीजे मेडिकल कॉलेजवर यापूर्वीही रॅगिंगचे आरोप झाले आहेत. गेल्या वर्षी, एका निवासी डॉक्टरचे रॅगिंग केल्याच्या आरोपावरून तीन निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते.

सिम्बायोसिसचे संस्थापक एस.बी. मुजुमदार यांच्या नातवाशी संबंधित आणखी एका गाजलेल्या प्रकरणात, तीन निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते आणि ऑर्थोपेडिक्स विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. शिरीष बारटक्के यांची बदली करण्यात आली होती.
Maharashtra TimesRamesh Mhatre : पीडित-साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही, महाराष्ट्राबाहेर जातो, पण जामीन द्या; शिवसेना नगरसेवक म्हात्रेंचे कोर्टात गयावया
कॉलेजचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले की, आमची संस्था तन्मयच्या पालकांच्या नियमित संपर्कात आहे आणि सर्व संबंधित माहिती गोळा करत आहे. पोलिसांचा शोध सुरुच आहे आणि चौकशी समिती येत्या काही दिवसांत आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा