Mukesh Khanna on CJP Students Protestors: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनावर अनेक सेलिब्रिटींनी सडकून टीका केली आहे. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा घेतली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू होती. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी काही विद्यार्थ्यांच्या वागणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर टीका केली. यावर अनेक सेलिब्रिटी व्यक्त झाले आहेत. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी मोदींवर टीका करणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.
काही आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेवर ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी टीका केली. ‘कॉकरोच जनता पार्टी‘ आणि या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर निशाणा साधत खन्ना यांनी, “असे लोक खऱ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करत नाहीत. यांना समाजातून हाकलून दिलं पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रियाही दिली आहे.
Sachin Goswami: जरा मेंदू ताब्यात घ्या,वापरा, फ्रेश वाटतं; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सचिन गोस्वामींनी सांगितली रामराज्याची व्याख्या “हा तर कट, विद्यार्थी अशी भाषा वापरत नाहीत” सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपला राग व्यक्त केला. ते म्हणाले की, मी सध्या भारताबाहेर असलो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील घडामोडींवर माझी बारीक लक्ष ठेवून आहे. NEET परीक्षा किंवा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या खऱ्या विद्यार्थ्यांबद्दल मला सहानुभूती आहे. पण आंदोलनाच्या नावाखाली पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल ज्या प्रकारे अत्यंत नीच आणि गलिच्छ भाषेचा वापर करण्यात आला, ते पाहून माझे मन हेलावलं आहे.”
मुकेश खन्ना यांनी पुढं दावा केला की, हे आंदोलन उत्स्फूर्त नसून पूर्णपणे नियोजीत होतं आणि यामागे मोठे राजकीय हेतू होते. हे लोक सरकार पाडण्याचे मनसुबे घेऊन आले होते. दिवसभर घोषणाबाजी करायची, शिवीगाळ करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या, हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण असू शकत नाही. पैशांसाठी देशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांचा हा कट आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना थेट इशारा या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना इशारा देताना मुकेश खन्ना म्हणाले की अशा लोकांच्या नादी लागून कॅमेऱ्यासमोर केलेली ही वर्तणूक इतिहासात नोंदवली गेली आहे. यामुळं तरुणांच्या भविष्यातील नोकरी आणि करिअरच्या संधींवर मोठा परिणाम होऊ शकतो. देशातील कोणत्याही आई-वडिलांनी आपल्या मुलांकडून पंतप्रधानांना अशा शिव्या देताना ऐकलं, तर त्यांची मान शरमेनं खाली झुकल्याशिवाय राहणार नाही. अशा संगतीत राहून तुम्ही स्वतःचं आयुष्य खराब करत आहात. अशा लोकांच्या जाळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडा, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा