Headlines

Property Rights: पालकांच्या मालमत्तेवर मुला-मुलीचा जन्मसिद्ध हक्क नाही, कायदा काय? 4 कारणांमुळे होऊ शकतात बेदखल – property rights son or daughter cannot inherit their parents property can be forfeited in 4 cases

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Children’s Birthright to Parents Property: आपले आई-वडील म्हणजे पालकांच्या संपत्ती किंवा प्रत्येक मालमत्तेवर मुलगा-मुलीचा जन्मसिद्ध अधिकार असतो हा आपल्या समाजात प्रचलित असलेला सर्वात मोठा समज आहे. पण खरंच तसं आहे का?

Sons' and Daughters Rights over Parents Property
4 कारणांमुळे पालक मुला-मुलीला मालमत्तेतून बेदखल करू शकतात
Property Rights: मुला-मुलींना पालकांच्या मालमत्तेवर जन्मसिद्ध अधिकार असतो का? पालकांची काळजी न घेणं, एकमेव कारण नाही, इतर काही विशिष्ट परिस्थितीत मुलांना पालकांच्या मालमत्तेपासून कायदेशीररित्या वंचित केले जाऊ शकते.

मुलांना पालकांच्या मालमत्तेत जन्मसिद्ध अधिकार नाही

मुलांना पालकांच्या मालमत्तेत जन्मसिद्ध अधिकार नाही

मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर जन्मसिद्ध हक्क असतो, असे लोक अनेकदा गृहीत धरतात. पण खरी परिस्थिती खूप वेगळी आहे. कायद्यात केवळ हक्कांविषयीच नव्हे, तर कर्तव्यांविषयीही माहिती दिल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. पालकांची काळजी घेण्यात अपयश येणं मालमत्तेतून बेखल होण्याचे एकमेव कारण नाही, तर अशी अनेक कायदेशीर कारणे आहेत जी मुलांना एक पैसाही मिळण्यापासून रोखू शकतात. अशी कोणती प्रमुख कारणे आहेत जी मुलांना पालकांच्या मालमत्तेपासून दूर ठेवू शकतात, समजून घेऊया.

आई-वडिलांची स्वतःची मालमत्ता

आई-वडिलांची स्वतःची मालमत्ता

वडिलोपार्जित आणि वैयक्तिक असे मालमत्तेचे दोन प्रकार असतात. पालकांनी मालमत्ता स्वतःच्या कष्टाच्या पैशाने खरेदी केलेली असेल तर, त्यावर त्यांना 100% माळी हक्क असतो. अशी मालमत्ता पालक आपल्या मर्जीने कोणत्याही ओळखी-अनोळखी व्यक्तीला, एखाद्या ट्रस्टला देऊ शकतात किंवा मृत्युपत्राद्वारे मुलांपैकी एकाला वारसा हक्कातून वगळू शकतात. अशा परिस्थितीत, मुलं आपल्या हक्कासाठी न्यायालयाती दाद मागू शकत नाही.

पालकांसोबत गैरवर्तन

पालकांसोबत गैरवर्तन

याशिवाय मुलगा किंवा मुलीने पालकांवर हात उगारला, मानसिक छळ करत असेल किंवा इतर प्रकारे गैरवर्तन करत असेल तर Maintenance and Failure of Parents and Senior Citizens Act या कायद्यानुसार पालक मुलांना मालमत्तेतून बाहेर काढण्यासाठी न्यायाधिकरण किंवा न्यायालयात दाद मागू शकतात. इतकेच नव्हे तर या अटीअंतर्गत पूर्वी प्रदान केलेली मालमत्ता किंवा दानपत्रे देखील रद्द केली जाऊ शकतात.

जीवे मारण्याचा प्रयत्न

जीवे मारण्याचा प्रयत्न

हिंदू उत्तराधिकार कायदादेखील महत्त्वाचा आहे. यानुसार एखाद्या मुलाने मालमत्तेच्या लोभापोटी किंवा इतर कारणांमुळे पालकांची हत्या केली किंवा जीवेमारण्याचा प्रयत्न केल्यास कायदा मुलाला अपात्र ठरवू शकतो. म्हणजे अशा मुलगा किंवा मुलीला पालकांना मालमत्तेवर कोणताही हक्क नसतो.

मृत्युपत्रातून वगळणे

मृत्युपत्रातून वगळणे

पालकांनी कायदेशीररित्या मृत्युपत्र तयार केले असेल आणि त्यात कोणत्याही मुलांची नावे वगळली तर, त्यांच्या पश्चात मालमत्तेची विभागणी मृत्युपत्रानुसार केली जाईल. अशा परिस्थितीत, मृत्युपत्र बनावट असल्याचे सिद्ध करण्यासारख्या ठोस कायदेशीर आधारांशिवाय मुलगा-मुलीला मालमत्तेचा वारसा मिळू शकत नाही.

अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या जन्मदात्यांची योग्य काळजी घेतली नाही किंवा त्यांच्यासोबत गैरवर्तन केले तर, मालमत्तेवरील तुमचा कायदेशीर हक्क कमजोर होऊ शकतो. लक्षात घ्या की कायद्यानुसार हक्कांसोबत नेहमी जबाबदाऱ्याही येतात.