Headlines

Abishek Porel Kolkata High court order IPL Delhi Capitals cricketer to arrest for Assault on pretext of marriage Crime News; अभिषेकला अटक करा; लग्नाच्या आमिषाने संबंधांचा आरोप, IPL क्रिकेटपटूला बेड्या ठोकण्याचे कोर्टाचे आदेश


IPL Cricketer arrest order : पश्चिम बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

Abishek Porel IPL Cricketer Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोलकाता : लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेला आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला अटक करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. तक्रारदार महिलेसोबतचे कथित खाजगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी अभिषेकची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

पश्चिम बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. तक्रारदार महिलेला धमकावल्याचाही आरोप अभिषेकवर आहे.

कोण आहे अभिषेक पोरेल?

२३ वर्षांचा अभिषेक हा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्याने पश्चिम बंगालसाठी ११६ सामने खेळले आहेत. आयपीएलमधील ‘दिल्ली कॅपिटल्स’ संघाकडून तो ३५ सामने खेळला आहे. दिल्लीने त्याला ४ कोटी रुपयांना संघात रिटेन केले होते.

फ्लॅटवर नेऊन लग्नाच्या आमिषाने संबंध

महिलेच्या तक्रारीनुसार, अभिषेकशी जानेवारी २०२३ मध्ये तिची भेट झाली होती. अभिषेकने तिला मंकुंडू येथील आपल्या फ्लॅटवर नेले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले, असा आरोप त्या महिलेने केला आहे. नंतर तिला समजले की, आरोपीचे इतर महिलांशीही संबंध होते.
Maharashtra TimesUday Krishna Reddy : माझी सॉलिड इच्छा होतेय रे… रुममध्ये शिरुन जबरदस्ती किस, मी तिच्या नवऱ्याला व्हिडिओ पाठवला; प्रशिक्षणार्थी IPS च्या चिठ्ठीने खळबळ
अभिषेकने मला डांबून ठेवले, मला अन्न-पाणी दिले नाही, इतरांपासून वेगळे ठेवले, असाही आरोप त्या महिलेने केला आहे. २ एप्रिल २०२६ रोजी दिल्लीत घडलेल्या घटनेनंतर तिची प्रकृती खालावली, त्यामुळे तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती. तिला फोन आणि सोशल मीडियाद्वारे धमक्या मिळाल्याचा आरोपही तिने केला आहे.

पेन ड्राईव्हमध्ये गोपनीय माहिती

तपासादरम्यान एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. त्यात महत्त्वपूर्ण डिजिटल माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कथित आक्षेपार्ह माहिती पुढे शेअर होण्यापासून रोखण्यासाठी आरोपीला अटक करणे आणि त्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करणे आवश्यक असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

VIDEO | दिल्लीतील आंदोलनाला कोल्हापुरातून पाठींबा, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर

अटक करण्याचे कोर्टाचे आदेश

पोलीस आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना अद्याप अटक करण्यात यश आलेले नाही. आरोपीला अटक करण्याबाबत आणि डिजिटल पुरावे सुरक्षित राखण्याबाबतची कार्यवाही जलद गतीने करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
Maharashtra TimesCrime News : ‘अतुलची बायको’ हातावर नवऱ्याच्या नावाचा टॅटू, मात्र त्याचाच जीव घेतला; स्कूलबस चालक प्रियकरासह अटक, शेजारी चकित

अभिषेकने आरोप फेटाळले

दरम्यान, क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जर माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल झाली असेल, तर ते आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे त्याने म्हटले आहे. हे प्रकरण २३ जून २०२६ रोजी कोलकात्यातली मोगरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.