Prakash Raj On Modi Government : प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – शनिवार, १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यामुळे सर्वत्र संताप उसळला. दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेनं पोलिसांकडून मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा दावा करत तात्काळ उपोषणाची घोषणा केली. पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात ओढत नेल्याचा दावाही त्यानं केला. दीपकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. आता प्रकाश राज यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत सरकारवर संताप व्यक्त केला आहे. रणवीर शौरी आणि अतुल कुलकर्णी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधत लिहिलं की, ‘जग एका घाबरट सरकारला पाहतंय, या सरकारला तरुणांशी संवाद साधायचा नाही, उलट हुकूमशाहीसारखं वागत आहे. सोनम वांगचुक यांना सक्तीनं घेऊन जाणं आणि विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनात अडथळा आणणं हे भीतीचं लक्षण आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे.’
अतुल कुलकर्णी यांनी या विषयावर थेट भाष्य न करता, १९८४ मध्ये सोनम वांगचुक यांचे वडील, सोनम वांग्याल, उपोषणावर असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लेहला धाव घेऊन त्यांचं उपोषण कसं संपवलं होतं, याची आठवण सांगितली. त्यांनी यासंबंधीचे एक पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत लिहिलं, ‘उपोषण सोडण्याचा आणखी एक मार्ग.’
अभिनेता रणवीर शौरीनंही सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात नेण्यावर प्रतिक्रिया दिली. ‘हे सरकार आता स्वतः विरोधी पक्षालाच शस्त्रे पुरवत आहे. किती उदात्तपणा आहे.’
hunger strike मुळे Sonam Wangchuk यांची प्रकृती गंभीर, २० व्या दिवशीही म्हणाले ‘मी मरणार नाही..’
दरम्यान, सोनम वांगचुक कॉकरोच जनता पार्टीच्या सहकार्यानं जंतर मंतरवर आंदोलन करत होते. ते ६ जून रोजी जंतर मंतरवर आले. नीट पेपरफुटी आणि इतर परीक्षांमधील अनियमिततेवरून सोनम वांगचुक यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी २८ जून रोजी उपोषण सुरू केलं आणि त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली. २१ दिवसांच्या उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांचं वजन जवळपास १० किलो कमी झालं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा