Post Office Investment Schemes: केंद्र सरकार-समर्थित पोस्टाच्या योजनांमधील गुंतवणूक जोखीम-मुक्त मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत ज्यामध्ये थेट सरकारकडून सुरक्षेची हमी दिली जाते. तसेच, या योजनांवर आकर्षक व्याजदरही मिळतो.

सरकारी सुरक्षा, शून्य जोखीम
पोस्टाच्या योजनांमध्ये शून्य-जोखीम सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय असतात. कोणतीही गुंतवणूक मोठी असो वा लहान, सरकार स्वतः सुरक्षेची हमी देते. पोस्ट ऑफिस MIS योजना विशेषतः सेवानिवृत्त व्यक्ती आणि बाजारातील जोखमीशिवाय नियमित उत्पन्न हवे आहे अशा लोकांसाठी आहे आणि ही योजना तुमच्या मासिक उत्पन्नाची खात्री देते. तसेच या योजनेत तुम्हाला दरमहिन्याला हमी उत्पन्न मिळते.
पोस्टाच्या योजनेत सरकारचे आकर्षक व्याजदर
पोस्त ऑफिसच्या MIS योजनेअंतर्गत सरकार सध्या 7.4% दराने मासिक व्याज देत असून तुम्ही या सरकारी योजनेत फक्त 1000 रुपयांच्या सुरुवाती गुंतवणुकीसह खाते उघडू शकता तर, तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. तुम्ही आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन अर्ज करू शकता.
एकरकमी गुंतवणुकीची मर्यादा किती?
मासिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या या पोस्ट ऑफिस MIS योजनेअंतर्गत एक व्यक्ती एकल खात्यात जास्तीत जास्त 9 लाख आणि संयुक्त खात्यात 15 लाख गुंतवू शकते. यानंतर व्याजाची कमाई जमा होण्यास सुरुवात होईल आणि पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.
Overtime Rule: कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमसाठी दुप्पट पगाराची तरतूद, पण प्रत्यक्षात मिळणार की कागदावरच राहणार? सरकारने स्पष्ट सांगितलेअशाप्रकारे, पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेअंतर्गत संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला 7.4% सध्याच्या व्याजदराने 5 वर्षांसाठी दरमहा 9250 रुपये मिळतील, म्हणजे पाच वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत केवळ व्याजाच्या रूपात 5.55 लाख रुपये मिळतील.
एक चूक अन् सगळी मेहनत वाया जाईल
या एक-वेळच्या पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजनेतील व्याजाची रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक काढता येते. पण, या योजनेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी ही योजना मुदतपूर्तीच्या तारखेपर्यंत सक्रिय ठेवणे आवश्यक आहे आणि त्याआधी खाते बंद केल्यास तोटा होऊ शकतो.
पोस्टाच्या MIS योजनेच्या नियमांनुसार, खाते उघडल्यापासून 1 ते 3 वर्षांच्या आत बंद केल्यास मुद्दलातून 2% कपात होईल तर, 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान खाते बंद केल्यास 1% कपात होईल. याशिवाय, मुदतपूर्तीपूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते आणि जमा केलेली रक्कम नॉमिनीकडे हस्तांतरित केली जाते.

