Police sub inspector arrested for demanding bribe from a 60 year old; हुशारी दाखवली, तरीही PSI अडकला; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी ६० वर्षीय व्यक्तीकडे लाच मागणं महागात
Police sub inspector arrested for demanding bribe from a 60 year old; हुशारी दाखवली, तरीही PSI अडकला; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी ६० वर्षीय व्यक्तीकडे लाच मागणं महागात
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: रक्षकच भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. शहरातील पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाने ६० वर्षीय ज्येष्ठाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रकांत कामठे (वय ३८, रा. सातारा परिसर) असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस उप निरीक्षकाचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या अर्जावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल केल्याचे बक्षीस म्हणून तसेच प्रकरणातील आरोपींना अटक करून गुन्ह्यात मदत करण्यासाठी पीएसआय चंद्रकांत कामठे याने स्वतःसाठी आणि पोलीस निरीक्षक पवार यांच्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने ११ मार्च २०२६ रोजी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी पीएसआय कामठे यांनी स्वतःसाठी व पो.नि. पवार यांच्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि तडजोडीअंती ती स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले. दुसऱ्या दिवशी १२ मार्च रोजी पुन्हा तक्रारदाराला पाठवण्यात आले, मात्र त्या दिवशी पोलीस निरीक्षक पवार यांची भेट झाली नाही.
संशय आल्याने टाळाटाळ, तरीही ‘एसीबी’चा दणका
दरम्यानच्या काळात आरोपी पीएसआय कामठे यांना एसीबीच्या कारवाईचा संशय आल्याने त्याने तक्रारदाराला भेटणे टाळण्यास सुरुवात केली. तसेच मध्यंतरी पो.नि. पवार यांची त्या ठिकाणाहून बदली झाली. त्यामुळे आता कामठे लाचेची रक्कम स्वीकारणार नाहीत, असा जबाब तक्रारदाराने दिला. मात्र, पंचांसमक्ष ५० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने पीएसआय कामठे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, ही कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, तपास अधिकारी चैनसिंग गुसिंगे आणि हवालदार रवींद्र काळे यांच्या पथकाने केली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा