Good news rainfall intensity expected to increase in next three days in marathwada; आनंदाची बातमी! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठवाड्यातील बळीराजाची चिंता दूर होणार
Good news rainfall intensity expected to increase in next three days in marathwada; आनंदाची बातमी! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठवाड्यातील बळीराजाची चिंता दूर होणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणांतील विसर्ग कायम आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असून रविवारी सायंकाळी जायकवाडीचा पाणीसाठा ५१.४४ टक्के झाला. धरणात ६८ हजार १४३ क्युसेक आवक होत आहे, अशी माहिती ‘कडा’ विभागाने दिली आहे. विभागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर विसर्ग सोडण्यात आला आहे. सलग पाचव्या दिवशीही विसर्ग कायम आहे. गोदापात्रात पाणी सोडल्यामुळे जायकवाडीत आवक वाढली आहे. जायकवाडी धरणात रविवारी ६८ हजार १४३ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे पाणीसाठा ५१.४४ टक्के झाला आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) दिली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ६५ हजार ९०० क्युसेक, गंगापूर चार हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, मराठवाड्यात शनिवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. गेल्या २४ तासांत विभागात ३.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ६.६ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर २.२ मिमी, जालना २, बीड २.३, लातूर २.४, धाराशिव ५, नांदेड ४.१, परभणी ४.९ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे.
पुण्यात पावसाचा जोर ओसरला
आठवडाभर शहरात सर्वदूर बरसलेल्या पावसाचा जोर शनिवारी ओसरला. सकाळी हलक्या सरी पडल्या; पण दुपारनंतर आकाश निरभ्र होते आणि ऊन पडल्यामुळे पुणेकरांना काही वेळासाठी दिलासा मिळाला. दिवसभरात कमाल २९.६ आणि किमान २२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. संध्याकाळी तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्यानंतर हवेत पुन्हा गारवा जाणवला. तळेगाव, चिंचवडमध्ये पाच मिलिमीटर, कोरेगाव पार्क, हडपसर एक मिमी पाऊस नोंदवला गेला. लवळेमध्ये मात्र, ५६ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरात हलक्या सरी पडणार असल्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा