Headlines

Poladpur Mahabaleshwar Road Ambenali Ghat Scorpio Accident Eight Youth from Satara Died all the Bodies Recovered after 22 Hours; आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं, 8 बॉडीज दरीतून बाहेर; दृश्य बघून सगळ्यांचाच कंठ दाटला


Raigad Ambenali Ghat Accident : रायगडमधील आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन तब्बल 22 तासांनी संपलं. दरीतून 8 तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Satara Asgaon 5 Youth Died in Ambenali Ghat Accident
सातारा तरुण अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, रायगड : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात स्कार्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. शेवटचा मृतदेह रात्री 8 वाजता दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आणि तब्बल 22 तासांनी रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान ट्रेकर्संना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाडच्या सिस्केप टीमने हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं.

पावणेदहा वाजता फोन आणि…

आंबेनळी घाटात एक स्कार्पिओ गाडी दरीत कोसळलीअसल्याचा मेसेज महाबळेश्वर ट्रेकर्सला काल रविवारी रात्री पावणेदहा वाजता मिळाला. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिकेत वागदरे, सोमनाथ वागदरे, संकेत सावंत हे घटनास्थळाकडे रवाना झाले. आंबेनळी घाटातील एका ठिकाणी टॉर्च मारला असता संशयास्पद परिस्थिती दिसली. बाकी सदस्यांना बोलावून घेण्यात आलं. काही वेळात टीमचे सदस्य साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले.

Maharashtra TimesWater Shortage : डोक्यावर हंड्याचे इमले, घोटभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी तडफड; महाराष्ट्रातील पाणीटंचाईचं विदारक चित्र

वाकलेल्या झाडामुळे संशय बळावला

ट्रेकर्संनी सेटअप तयार करून रोपच्या सहाय्याने दरीत उतरायला सुरुवात केली. खाली पोहोचल्यानंतर एक गाडी दिसली. ती पुर्वीच्या अपघातातील होती. मग दुसऱ्या बाजूने पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत महाडची सिस्केप टीमही मदतीसाठी दाखल झाली. एका ठिकाणी महाबळेश्वर ट्रेकर्संचे सदस्य कुमार भाऊ शिंदे, अनिकेत वागदरे यांना एक बोर्ड वाकल्यासारखा दिसून आला. तसेच वाकलेल्या झाडामुळे गाडी इथूनच दरीत कोसळल्याचा संशय बळावला.

थोड्याच अंतरावर गाडीचा आरसा, मोबाईल दिसला. अपघाताचं ठिकाण निश्चित झाल्यानंतर ट्रेकर्स दरीत उतरले. त्यांना पहिल्यांदा दोन मृतदेह दिसले. निम्म्या सदस्यांनी दाभिळ गावाकडून शोध मोहीम सुरू केली. ज्याठिकाणी गाडी कोसळली होती, त्या ठिकाणी सर्व मृतदेह अस्ताव्यस्त पडले होते. झाडावरील मधमाश्यांचे पोळे आणि निसरड्या वाटेमुळे शोध कार्यात अडथळे येत होते.

Maharashtra TimesSatara Asgaon : पोटच्या लेकरांना बघण्यासाठी माऊलींचा हंबरडा, आसगावमध्ये प्रचंड आक्रोश; लहानपणी सोबत खेळलेले सवंगडी शेवटच्या प्रवासाला एकत्रच निघाले

8 जणांचे मृतदेह दरीतून वर काढले

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सलग 22 तास शोध मोहीम राबवत सर्व 8 जणांचे मृतदेह दरीतून वर काढले. आंबेनळी घाटातील हे रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, सिस्केप टीम महाड, एसव्हीआरएसएस टीम कोलाड या टीमच्या सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, सुनील केळगणे, जयवंत बिरामणे, अमित कोळी, सुजित कोळी, सोमनाथ वागदरे, सौरभ गोळे, सौरव सालेकर, अक्षय नाविलकर, कुमार शिंदे, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, आदित्य रांजणे, भाऊ सपकाळ, सूर्यकांत शिंदे, अनिल लांगी, प्रज्वल केळगणे, अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, संकेत सावंत,‌ मुन्ना उतेकर, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, मयूर जाधव, ओमकार सोनावणे, निखिल सावंत यांचा बचाव मोहिमेत सहभाग होता.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा