PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा विसर? श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यात तब्बल 16 गाड्या – questions raised over shrikant shinde s large convoy despite fuel saving appeal
PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा विसर? श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यात तब्बल 16 गाड्या – questions raised over shrikant shinde s large convoy despite fuel saving appeal
आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन आणि परकीय चलनाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर टाळावा अनावश्यक ताफा कमी करावा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. एकीकडे मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यात मात्र मोदींच्या आवाहनाचा विसर पडलेला दिसून आला. या दौऱ्यात श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यात एक दोन नव्हे तर तब्बल 16 चारचाकी वाहने दिसून आली. या गाड्या स्वतः शिंदे यांनी सांगितल्या नसल्या तरी त्यांच्या समर्थकांना इंधनाची बचत करण्याचा संदेश देण्यात शिवसेना अपयशी ठरल्याचं दिसून आलं.