Headlines

Parbhani swift car bus accident four from the same family died in jintur taluka; स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच


Accident News: ट्रॅव्हल्स चालक संतोष केशवराव शिंदे (वय ४९, रा. संभाजीनगर) हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगराला हलवण्यात आलं आहे.

parbhani accident
स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, परभणी : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपूर शिवारात रविवारी सायंकाळी भीषण अपघातात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत अन्य चौघे जखमी झाले आहेत. स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच १२ जीएफ ६२५९) हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून मंठा दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स (क्र. एमएच २० डीडी ७६६६) ने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यापासून सुमारे ५० ते ६० फूट फेकली गेली. अपघातात कारचा अक्षरशः चक्कचूर झाला आहे. कारमधून सय्यद अजहर सय्यद महमूद हे आपल्या कुटुंबीयांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते, पण बहीण भावाची भेट या अपघाताने होऊ शकली नाही.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, सय्यद इस्माईल सय्यद महमूद हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील रहिवासी आहेत. रमजान ईदचा सण साजरा केल्यानंतर रविवारची सुट्टी आल्याने सय्यद अजहर हे आपल्या कुटुंबीयांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कारणे निघाले होते. काल रविवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी दोनच्या दरम्यान हे कुटुंबीय आपल्या कापल्या कारने चारठाणा मंठा महामार्गाहून जात होते. चार ठाण्याजवळ गणेशपूर परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून प्रवासी घेऊन येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स बसची व सय्यद कुटुंबीयांच्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात सय्यद अबिदा महबूब, सय्यद सुमया अबिदा, सय्यद अबिद या तिघांचा जागेच मृत्यू झाला तर त्यांचा भाऊ सय्यद इस्माईल सय्यद महबूब हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तसेच सय्यद साहिधा अबिद सय्यद जोहेरा अंजुम आबिद व सय्यद मिरज हे गंभीर जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये एकूण १३ प्रवासी होते. त्यापैकी ४ ते ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. वाहनांचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून वेगमर्यादा आणि सुरक्षित वाहनचालन याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा