Headlines

Please Dont Retire Rohit Sharma Fans Make Emotional 2027 World Cup Appeal Video Viral | ‘रोहित प्लीज २०२७ चा वर्ल्ड कप खेळ’, चाहत्यांनी घेरलं, हीटमॅनची नजर पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी, व्हिडीओ व्हायरल


Rohit Sharma Fans Video: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या एकदिवसीय निवृत्तीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहितची लोकप्रियता दर्शवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते त्याला निवृत्ती घेऊ नकोस, अशी भावनिक विनंती करत आहेत.

Rohit Sharma ODI Retirement
(फोटो सौजन्य – viralinningss/Instagram)
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केला. खरं तर इंग्लंड दौऱ्यावर आल्यापासून भारतीय संघ एकामागून एक सामने गमावत आहे. त्यामुळे हा आणखी एक पराभव पाहून चाहते फारसे चकित झाले नाहीत. मात्र, या पराभवानंतर एक अशी मोठी चर्चा समोर आली, ज्याबद्दल चाहते सातत्यानं चिंता व्यक्त करत होते. रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार का? खरं तर याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

मात्र, लॉर्ड्समध्ये रोहित त्याचा शेवटचा सामना खेळणार असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रोहितला निवृत्ती घेऊ नकोस, अशी विनंती करणाऱ्या चाहत्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. “प्लीज रोहित, २०२७ चा वर्ल्ड कप खेळ,” अशी विनंती त्याचे चाहते करत आहेत. त्यावर रोहितही भावूक नजरेनं चाहत्यांना प्रतिसाद देताना दिसत आहे. जर तुम्ही रोहित शर्माचे चाहते असाल, तर हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

मुंबईचा राजा रोहित शर्मा

रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यानं ४७ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. वास्तविक, रोहित हा अत्यंत आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. २०-२५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणं ही त्याच्यासाठी खूपच सामान्य बाब आहे. मात्र, आता तो करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे कदाचित आधीसारखी आक्रमक फटकेबाजी करणं त्याला कठीण जात असेल. मात्र, लक्षवेधी बाब म्हणजे अशा स्थितीतही चाहते त्याला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहेत. रोहित फलंदाजी करत असताना इंग्लिश चाहतेही “मुंबईचा राजा रोहित शर्मा” अशा घोषणा देत त्याचं मनोबल उंचावत होते. आणि सामना संपल्यानंतर “प्लीज निवृत्ती घेऊ नकोस,” अशा विनंत्याही त्यांनी त्याला केल्या. हे भावूक करणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

रोहित शर्मा निवृत्ती घेईल का?

​ ​

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळपट्टी थोडीशी आव्हानात्मक होती. त्यातच इंग्लंडमधील ढगाळ वातावरणामुळे चेंडू दोन्ही दिशांनी स्विंग होत होता. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणं अवघड जात होतं. मात्र, अशा परिस्थितीतही रोहितनं ४७ चेंडू क्रीजवर तग धरला. त्यामुळे अनेक क्रिकेट समीक्षक त्याच्या संयमी खेळीचं कौतुक करत आहेत.

मात्र, रोहितचं वय आता ४० च्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याच्या निवृत्तीच्या चर्चाही रंगत असतात. असो, पण तुम्हाला काय वाटतं? रोहित शर्मा २०२७ चा वनडे विश्वचषक खेळू शकेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा