Kerala family Pimpri Death : टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी कुटुंबाने अनेक दिवस याचा विचार आणि नियोजन केले होते. या घातक रसायनाविषयी त्यांनी इंटरनेटवर काय माहिती शोधली होती, याचा तपास सुरु आहे

मृत्यूचा वेदनादायी मार्ग
शुक्रवारची रात्र ही पिल्लई कुटुंबासाठी शेवटची रात्र ठरली. मृत्यूला कवटळण्यासाठी या कुटुंबाने अत्यंत धक्कादायक मार्गाचा अवलंब केला आहे. रात्रीच्या वेळी घरात पेटत्या कोळशावर त्यांनी ‘सोडियम नायट्रेट’ नावाचे अत्यंत विषारी रसायन ओतले. यामुळे संपूर्ण बंद खोलीत एक प्रकारचा विषारी आणि जीवघेणा धूर पसरला. श्वासोच्छवासावाटे हा धूर शरीरात गेल्याने तिघेही बेशुद्ध पडले. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना उघडकीस आली.
दोन दिवसांची झुंज अपयशी
या भयानक घटनेत कुटुंबाचे प्रमुख विनोद पिल्लई यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, त्यांच्या ४५ वर्षीय पत्नी सिरजा आणि १९ वर्षांची मुलगी पौर्णिमा या दोघींना अत्यंत गंभीर अवस्थेत वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात सलग दोन दिवस मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याची शर्थीची झुंज दिली, मात्र विषारी रसायनाचा प्रभाव इतका भयंकर होता की, रविवारी या मायलेकींनीही अखेरचा श्वास घेतला. या मृत्यूंसोबतच पिल्लई कुटुंबाचा कायमचा अंत झाला.
Rohit Sharma : 17 व्या वर्षी उभारलेलं ‘चायवालाज्’ अचानक बंद, मग अध्यात्मात झोकून दिलं; युवा उद्योजक रोहित शर्मांचा चटका लावणारा शेवट
उच्चशिक्षित कुटुंबाची दुर्दैवी अखेर
या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे हे संपूर्ण कुटुंब अतिशय उच्चशिक्षित होते. कुटुंबाचे प्रमुख विनोद हे देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या ‘आयआयएम, अहमदाबाद’ चे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या पत्नी सिरजा या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ‘समन्वयक’ या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. त्यांची एकुलती एक लाडकी लेक पौर्णिमा ही कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती.
दोन महिन्यांपूर्वीच ऑर्डर
दरम्यान, संत तुकारामनगर पोलिसांच्या तपासात एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. हा निर्णय रागाच्या भरात किंवा क्षणिक नैराश्यातून घेतलेला नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पिल्लई यांनी तब्बल दोन महिन्यांपूर्वीच, म्हणजेच १ जून रोजी, ऑनलाईन माध्यमातून ‘सोडियम नायट्रेट’ या प्रतिबंधित आणि अत्यंत घातक रसायनाची ऑर्डर दिली होती.
Nana Patole Troll | भाजपकडून पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल, पाद्यपूजन करणारा कार्यकर्ता काय म्हणाला?
याचाच अर्थ, हे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी अनेक दिवस याचा विचार आणि नियोजन केले होते. या घातक रसायनाविषयी त्यांनी इंटरनेटवर काय माहिती शोधली होती, हे तपासण्यासाठी आता पोलीस सायबर सेलची मदत घेत आहेत. तसेच, सत्य पडताळून पाहण्यासाठी तिघांचेही मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ते तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
शेवटची चिठ्ठी सापडली
तर, घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक नोट लागली आहे. यात विनोद यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, “आम्ही स्वेच्छेने आमचे जीवन संपवत आहोत. हा निर्णय आम्ही केवळ आणि केवळ आर्थिक विवंचनेमुळे घेत असून, यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये.”
Crime News : कॅब चालकाचे प्रवाशाशी प्रेमसंबंध जुळले, बायकोचा काटा काढला अन् तिच्यावरच खापर फोडलं, दोघं अटकेत
मिळालेल्या माहितीनुसार, पिल्लई कुटुंब काही वर्षांपूर्वीपर्यंत नेहरूनगर भागात स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहायचे. मात्र, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे तीन वर्षांपूर्वी त्यांना ते घर विकावे लागले आणि तेव्हापासून ते मोरवाडीत एका भाड्याच्या घरात राहत होते. सततचा मानसिक ताण आणि डोक्यावर असणाऱ्या आर्थिक ओझ्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तरीही, यामागे कोणा सावकाराचा तगादा होता का? किंवा कोणाकडून त्यांच्यावर दबावाचा वापर करून मानसिक छळ केला जात होता का? या सर्व शक्यतांचा संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

