Headlines

Pimpri chinchwad worker bhavesh wani dies in accident after last message to wife; दीड वर्षांपूर्वी लग्न, बायकोला तो मेसेज केला अन् दुसऱ्याच क्षणाला सगळं संपलं; जेवत्या ताटावरच भावेशवर काळाचा घाला


म. टा. प्रतिनिधी, पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेला २४ तास उलटल्यानंतर त्याचा मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. दरम्यान, या इमारतीच्या राडारोड्याखाली आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी आठ कामगार अडकले असून त्यांच्या जीविताला धोका असल्याची भीती बचाव पथकाने व्यक्त केली आहे.

मोशीतील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर बुधवारी दुपारी कचऱ्याचा डोंगर कोसळला. हजारो टन कचरा इमारतीवर कोसळल्याने तीन मजली इमारत कोसळून त्यात १८ कामगार अडकले. तर पाच कामगारांनी उड्या मारून आपला जीव वाचविला. घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सैन्य दलातील (आर्मी) जवानांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करत एक महिला आणि सहा पुरुष अशा सात कामगारांना बुधवारी रात्री उशिरापर्यंत बाहेर काढले. गुरुवारी सकाळी कचऱ्याचे ढीग बाजूला सारून दोन कामगारांना बाहेर काढले. ते जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच कचऱ्याच्या ढिगाखाली आणि इमारतीच्या खांबाखाली अडकलेल्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. भावेश वाणी असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

भावेश वाणी यांची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दुपारच्या जेवणासाठी पत्नीला ‘जेवायला बसलो आहे,’ असा संदेश पाठविल्यानंतर काही मिनिटांतच मृत्यूने गाठावे, अशी कल्पनाही भावेश वाणी यांच्या कुटुंबीयांनी केली नव्हती. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, पत्नीच्या आयुष्याचा आधार आणि कुटुंबाची भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणारे भावेश यांचा मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेने दीड वर्षांपूर्वी थाटलेला संसार क्षणात उद्ध्वस्त झाला असून, वाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोशी येथील महापालिकेच्या कचरा डेपोत बुधवारी घडलेल्या दुर्घटनेत भावेश वाणी यांचा मृत्यू झाला.

मूळ जळगाव जिल्ह्यातील वाणी कुटुंबातील वडील मोहन वाणी यांनी पापड आणि पाव विकून संसार चालवला. भावेश यांनी १० वर्षांपूर्वी नोकरीसाठी पुणे गाठले. सुरुवातीला खडकी येथे राहणाऱ्या भावेश यांनी सात वर्षांपूर्वी ‘अँथनी वेस्ट’ कंपनीत वरिष्ठ कार्यकारी लेखापाल म्हणून काम सुरू केले. कासारवाडी आणि मोशी येथील कार्यालयांमध्ये त्यांची जबाबदारी होती. दीड वर्षांपूर्वी मोहिनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. रूपीनगर येथे आई-वडिलांसह राहताना पाच वर्षांपूर्वी बहिणीचे निधन झाल्याने भावेश हेच कुटुंबाचा एकमेव आधार होते. तीन दिवस ते कासारवाडी कार्यालयात होते. बुधवारी त्यांची ड्युटी मोशी येथे लागली आणि नियतीने घात केला. भावेश यांच्या मृत्यूबाबत कळताच पत्नी मोहिनी यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांची वारंवार शुद्ध हरपत असून, आई शालिनी वाणी यांचीही प्रकृती बिघडून त्यांना ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल केले आहे.

“भावेश आणि मी दोन वर्षांपासून कासारवाडीतील कार्यालयात एकत्र काम करीत होतो. कामाप्रति निष्ठा असलेल्या भावेशचा शांत, निगर्वी स्वभाव होता. सर्वांशी मिळून मिसळून वागत असे. तीन दिवस आम्ही कासारवाडीतील कार्यालयात होतो. बुधवारी तो मोशीतील कार्यालयात गेला. मंगळवारची आमची भेट शेवटची ठरेल, असे मनातही आले नाही,” अशा शब्दांत भावेश वाणी यांचे सहकारी राहुल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची नावे अशी आहेत : महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजित पाटील, नागेश गायकवाड, वामन कसबे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत