Pimpri Chinchwad Crime News : पुण्यात पुन्हा हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेनं ही हत्या केल्याचं समोर आलेलं आहे.

आरोपीला मारहाण करून तिचा हात पिरगाळला
हनुमंत सोपान शितोळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयूर शितोळे (३०, कासारसाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयवंता भगवंत तिडके (५०, कासारसाई) या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत हनुमंत शितोळे आणि आरोपी महिला हे दोघे कासारसाई येथे दारू पीत होते. दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. या भांडणात हनुमंत यांनी आरोपीला मारहाण करून तिचा हात पिरगाळला. याचा राग आल्याने आरोपीने तेथे पडलेला दगड उचलून हनुमंत यांच्या डोक्यात व छातीत जोराने मारला. यात त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
ऑफिसमध्ये तोडफोड करुन खंडणीची मागणी
वाकड येथील ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये घुसून तोडफोड करुन दरमहा ५० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी पहाटे चार वाचण्याच्या सुमारास भुजबळ चौक येथे घडली. कार्तिक हनुमंत बारवे (वय २३, रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास काळे (वय २८, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळवंडी प्रकरणाचा एसआयटीकडून तपास
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अटक आरोपीने पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याविरोधात पुरावे संकलित करण्यात येत आहेत. गुन्हा घडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस प्रयत्नशील आहेत.
Mumbai News : लोखंडी सळई उडून डोक्यावर आदळली, विद्याविहारमध्ये विद्यार्थी जखमी, डोक्याला टाके, महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप
या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपीविरोधात अपहरण, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ ऑगस्टला घडली होती. पेरू खायला देण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर तिचा खून करून मृतदेह ओढ्याजवळ टाकला, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर जुन्नर तालुक्यात संतप्त पडसाद उमटले असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
पंधरा दिवसांत तपास पूर्ण करणार
पथकामध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि आळेफाटा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे. घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण आदी पुरावे संकलित करण्यावर पोलिस भर देत आहेत. घटना घडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

