Headlines

Pimpri Chinchwad Kasarsai Woman Killed Man on Drinking Alcohol; दारु पिताना भांडण, महिलेचा हात पिरगळला, हात पिरगळल्याने संतापून महिलेने मित्रालाच संपवलं; पुण्यात नेमकं काय घडलं?


Pimpri Chinchwad Crime News : पुण्यात पुन्हा हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेनं ही हत्या केल्याचं समोर आलेलं आहे.

Pimpri Chinchwad Crime News
कासारसाई महिलेने पुरुषाची हत्या केली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड : कासारसाई येथे दारू पिऊन झालेल्या वादातून दगडाने डोक्यात व छातीत मारून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कासारसाई- कूसगाव रस्त्यावरील कृष्ण मंदिरापुढील वन विभागाच्या जागेत घडली.

आरोपीला मारहाण करून तिचा हात पिरगाळला

हनुमंत सोपान शितोळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयूर शितोळे (३०, कासारसाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयवंता भगवंत तिडके (५०, कासारसाई) या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत हनुमंत शितोळे आणि आरोपी महिला हे दोघे कासारसाई येथे दारू पीत होते. दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. या भांडणात हनुमंत यांनी आरोपीला मारहाण करून तिचा हात पिरगाळला. याचा राग आल्याने आरोपीने तेथे पडलेला दगड उचलून हनुमंत यांच्या डोक्यात व छातीत जोराने मारला. यात त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Maharashtra TimesNashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’

ऑफिसमध्ये तोडफोड करुन खंडणीची मागणी

वाकड येथील ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये घुसून तोडफोड करुन दरमहा ५० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी पहाटे चार वाचण्याच्या सुमारास भुजबळ चौक येथे घडली. कार्तिक हनुमंत बारवे (वय २३, रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास काळे (वय २८, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळवंडी प्रकरणाचा एसआयटीकडून तपास

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अटक आरोपीने पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याविरोधात पुरावे संकलित करण्यात येत आहेत. गुन्हा घडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस प्रयत्नशील आहेत.

Maharashtra TimesMumbai News : लोखंडी सळई उडून डोक्यावर आदळली, विद्याविहारमध्ये विद्यार्थी जखमी, डोक्याला टाके, महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप
या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपीविरोधात अपहरण, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ ऑगस्टला घडली होती. पेरू खायला देण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर तिचा खून करून मृतदेह ओढ्याजवळ टाकला, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर जुन्नर तालुक्यात संतप्त पडसाद उमटले असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

Maharashtra TimesCabinet Decision : मंत्रालयात तोंडी नियुक्त्यांना लगाम, नियमबाह्य नेमणुका रद्द करण्याचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, वेतन बंद करण्याचा इशारा

पंधरा दिवसांत तपास पूर्ण करणार

पथकामध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि आळेफाटा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे. घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण आदी पुरावे संकलित करण्यावर पोलिस भर देत आहेत. घटना घडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा