Headlines

Nagpur Indira Gandhi Government Medical College Canteen Tukaram Mundhe Order to Close the canteen; वैध परवाना नाही, स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा, मेडिकल कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांना जेवण; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई


Nagpur Medical College Canteen FDA Raid : नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) परिसरातील श्री बालाजी उपहारगृहाला अन्न सुरक्षा विभागाने टाळे ठोकले आहे.

Nagpur Medical College Canteen FDA Raid
नागपूर मेयो रुग्णालय एफडीए कारवाई(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : संपूर्ण राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून नियमबाह्य अन्न व्यवसायांवर कारवाईचा धडाका सुरू असताना आता या कारवाईची झळ शासकीय संस्थांच्या परिसरातील उपहारगृहांनाही बसू लागली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) परिसरातील उपहारगृहावर अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. वैध अन्न परवाना नसतानाही उपहारगृह सुरू असल्याचं तपासणीत उघड झाल्यानंतर श्री बालाजी उपहारगृह बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वैध अन्न परवाना नाही

मेयो परिसरातील या उपहारगृहातून महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना चहा, नाश्ता, जेवण तसेच विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला वैध अन्न परवानाउपहारगृहाकडे नसल्याचं तपासणीदरम्यान आढळलं. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत आवश्यक नियमांचं पालन न करता अन्न व्यवसाय सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maharashtra TimesNagpur Crime : भरधाव बाईकने आले, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, काचा फुटल्या, कुटुंबीय घाबरले; थरारक CCTV फुटेज

केवळ परवान्याचीच त्रुटी नसून…

अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपहारगृहाची तपासणी केली असता केवळ परवान्याचीच त्रुटी नसून स्वच्छता आणि अन्न हाताळणीबाबतही अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या. अन्न तयार करण्यासाठी आणि ग्राहकांना खाद्यपदार्थ देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परिसरात अपेक्षित स्वच्छता राखली जात नसल्याचं आढळलं. अन्नपदार्थ हाताळताना आवश्यक खबरदारी आणि स्वच्छतेच्या नियमांचंही पालन होत नसल्याचंही तपासणीत समोर आलं.

उपहारगृह बंद करण्याचे निर्देश

उपहारगृहात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची स्थितीही समाधानकारक नसल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. ओला तसेच इतर प्रकारचा कचरा योग्य पद्धतीने साठवणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध नसल्याचं आढळलं. याशिवाय अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतचा तपासणी अहवालही उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालं. अन्न तयार करणाऱ्या आणि हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले वैद्यकीय तपासणीचे अहवालही उपहारगृहाकडे उपलब्ध नसल्याचं तपासणीत समोर आलं. त्यामुळे अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत नसल्याचं स्पष्ट झालं. वैध अन्न परवाना नसणे, स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष, अन्न हाताळणीतील त्रुटी, अपुरे कचरा व्यवस्थापन, वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल नसणे आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे उपलब्ध नसणे, अशा अनेक त्रुटी आढळल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने उपहारगृह बंद करण्याचे निर्देश दिले.

Maharashtra TimesTukaram Mundhe: सचिन तेंडुलकरच्या भावापेक्षा माझा भाऊ खूपच मोठा; तुकाराम मुंढेंचे बंधूप्रेम, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट

कोणत्याही अन्न व्यवसायाला सवलत नाही

विशेष म्हणजे, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई आतापर्यंत खासगी हॉटेल, उपहारगृह आणि अन्न विक्रेत्यांपुरती मर्यादित असल्याची सामान्यांची धारणा होती. मात्र, आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातील उपहारगृहावर झालेल्या कारवाईमुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसायाला सवलत दिली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून मिळत आहे.

उपहारगृहाला आता आवश्यक अन्न परवाना घेणे, संबंधित कागदपत्रे सादर करणे तसेच तपासणीदरम्यान आढळलेल्या सर्व त्रुटी दूर करणे बंधनकारक राहणार आहे. या बाबींची पूर्तता केल्यानंतरच उपहारगृह सुरू करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शासकीय संस्थांच्या परिसरातील अन्न व्यवसायही आता विभागाच्या रडारवर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झालं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा