Headlines

Phulwa Khamkar Exclusive : जिमनॅस्टिक खेळाडू ते नृत्य दिग्दर्शिका, फुलवा खामकरनं उलगडला प्रवास; म्हणाली, ‘मला कंबरसुद्धा हलवायला यायची नाही’


Phulwa Khamkar : मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या इंडस्ट्रीतील करिअरबद्दल सांगितलं आहे.

Phulwa Khamkar Journey In Industry
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर तिच्या नृत्यानं चाहत्यांना भुरळ घालते. पण, तुम्हाला माहितीये का? फुलवा खामकरनं जिमनॅस्टिकचंही शिक्षण घेतलेलं आहे. जिमनॅस्टिकपासून ते डान्सर असा फुलवाचा प्रवास असून तिनं याबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

जिमनॅस्टिकपासून सुरू झालेला प्रवास

मुलाखतीदरम्यान फुलवा खामकर म्हणाली की, ‘मला खेळायला खूप आवडायचं. मी खूप लहान असताना माझे बाबा गेले. बाबा गेल्यानंतर आमच्या आईने आम्हाला श्री समर्थ व्यायाम मंदिरात घातलं. तिथून माझी खेळाडू म्हणून सुरुवात झाली. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मज्जा आली. कॉलेजमध्ये गाण्यावर जिमनॅस्टिकच्या मुमेंट्स करायच्या, ते मला खूप आवडायचं. तसेच रेकॉर्ड डान्स नावाचा प्रकार होता, त्याच्या स्पर्धा कॉलेजमध्ये झाल्या आणि मी तिथे नाचायला सुरुवात केली. तिथून माझा डान्सचा प्रवास सुरुवात सुरू झाला.’

Maharashtra TimesNimish Kulkarni : …म्हणून हास्यजत्रेत कधीतरीच दिसतो निमिष कुलकर्णी, अभिनेत्यानं सांगितलं कारण; व्यक्त केली खंत
फुलवा पुढे म्हणाली की, ‘मला कंबरसुद्धा हलवता यायची नाही. मग सिनेमाची गाणी बघून कॉपी करायचं, हावभाव समजून घ्यायचे, तिथून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. कॉलेज संपल्यानंतर मी कथ्थक शिकले. माझी आई भरतनाट्यम शिकलेली आहे. तिने मला कथ्थक शिकण्यास सांगितलं. तिथून मग रिऍलिटी शो केला. असं करत-करत अभिनयक्षेत्रात आले. सिनेमाक्षेत्रात कोरिओग्राफर म्हणून शिकत आले. युट्युब किंवा कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसताना इंडस्ट्रीतल्या दिग्गजांचे नंबर शोधून काढले आणि त्यांच्याकडे डान्स शिकायला गेले.’
Maharashtra TimesMandira Bedi : पतीचं वयाच्या ५०व्या वर्षी निधन, मानसिकरित्या खचलेली अभिनेत्री, घ्यावी लागलेली थेरेपी
‘कॉलेज सुरू असताना मी जिमनॅस्टिक क्लासेस घ्यायचे. 1993-94 सालचा जिमनॅस्टिकमधला शिवछत्रपती पुरस्कारही मला मिळाला. ‘बुगी वूगी’मुळे माझ्या रिऍलिटी शोची सुरुवात झाली.’ असं फुलवानं शेवटी सांगितलं आहे.


दरम्यान, फुलवा खामकर तिचे डान्सचे क्लासेससुद्धा चालवते आणि गेली २७वर्षे ती डान्स क्लासेस चालवतेय. फुलवाने ‘डान्स इंडिया डान्स’ या हिंदी रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता आणि टॉप ५ फायनलिस्ट स्पर्धकांमध्ये ती एक होती. तसेच फुलवा ‘बुगी वुगी’ हा डान्स रिऍलिटी शोची विजेतीही ठरली आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा