Headlines

आजचा पराभव बटलर आणि ब्रूकमुळे, पण मालिका गमावण्यामागे आमची एक सर्वात मोठी चूक, श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला


Shreys Iyer on IND vs ENG Series : भारताने आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडविरूद्धची मालिका गमावली, फक्त मालिकाच नाहीतर भारताला एकही विजय मिळवता आला नाही. पहिल्यांदाच भारताने इंग्लंडविरूद्ध मालिका गमावली त्यामुळे खेळाडूंनी चाहत्यांना निराश केले यात काही शंका नाही. ही मालिका गमावल्यावर श्रेयस अय्यरने सर्वात मोठी चूक काय झाली हे साांगितले आहे. नेमकी कोणती जाणून घ्या.

Shreyas Iyer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने व्हाईटवॉश दिलाय. भारताने पहिल्यांदाच इंग्लंडविरूद्धची टी-२० मालिका गमावली. शनिवारी झालेल्या सामन्यातही भारताला ५६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. कॅप्टन श्रेयस अय्यर याने कर्णधार झाल्यापासून एकही सामना जिंकला नाही. भारतासाठी त्याने सात सामन्यात कर्णधारपदाची जबाबदार पार पाडली. यामधील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. मात्र बाकी सर्व सामन्यामध्ये भारताचा पराभव झालाय. आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने मात केल्यावर इंग्लंडमध्ये भारत कमबॅक करेल अशी आशा सर्वांना होती. पण तसे काही झाले नाही. कमबॅक सोडाच भारताल मालिका गमवावी लागली. सामना संपल्यावर बोलताना कॅप्टन श्रेयस अय्यर याने मालिका गमावण्यामागे एक मोठी चूक झाल्याचं सांगितलं आहे.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

या मालिकेतून काय शिकायला मिळालं हे विचारल्यावर, या मालिकेतून शिकण्यासारखं खूप असून इथल्या परिस्थिती आणि खेळपट्टीसोबत जुळवून घेणं. मला वाटतं की आतापर्यंत मालिकेत ज्या मैदानावर आम्ही खेळलो त्यामधील हे सर्वोत्तम होतं. या मालिकेतून आम्ही एक शिकलो की सामने जिंकण्यासाठी फिल्डिंग महत्त्वाची असते, ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. खास करून तु्म्ही विदेशात खेळता त्यावेळी तिथल्या मैदानाचे आकारमान समजून स्वत:ला जितकं जूळवून घ्याल तितकं चांगलं असल्याचं श्रेयस अय्यर म्हणाला. भारताने शेवटच्या सामन्यातही तीन कॅच सोडले होते.
Maharashtra TimesIND vs ENG : इंग्लंडचा भारताला 4-0ने व्हाईटवॉश, शेवटच्या मॅचमध्येही 56 धावांनी पराभव; भारताविरूद्ध इतिहासातील दुसरी मोठी 233 धावांची भागीदारी
बटलरची स्फोटक फलंदाजी आणि नंतर हॅरीने केलेल्या खेळीने सामन्याचा पूर्णपणे गेम बदलला. त्यांच्या भागीदारीमुळेच त्यांचा डाव रुळावर आला. आमच्याकडून दोन महत्त्वाचे झेल सुटल्यामुळे सामना हातून गेला असं वाटतं. ते झेल झाले असते तर चित्र वेगळं असू शकलं असतं. पण तरीही या सामन्यातून खूप धडे मिळाले आणि मला खात्री आहे की पुढच्या वेळी जेव्हा संघ इथे खेळेल तेव्हा खेळाडू या चुका नक्कीच लक्षात ठेवतील, असं अय्यर म्हणाला.
Maharashtra TimesSuryakumar Yadav Viral Photo : श्रेयसला अपयशाचा फटका, अन् त्याचवेळी सूर्याच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोची चर्चा; कारण काय?
दरम्यान, इंग्लंड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर २० ओव्हरमध्ये २५७-३ धावा केल्या. यामध्ये बटलरची १३१ धावांची वादळी खेळी आणि हॅरी ब्रूकच्या नाबाद ९५ धावा महत्वाच्या ठरल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २० ओव्हरमध्ये २०१-८ धावाच करू शकला. या सामन्यामध्ये बटलर सामनावीर आणि हॅरी ब्रूक हा मालिकावीर ठरला आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा